विशेष प्रतिनिधी : रणजित वाघमारे
हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि खासदार संजय राऊत यांनी भ्रष्टाचार आणि वसुलीचे आरोप करूनही संबंधीत अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांच्यावर अद्यापपर्यंत कारवाई केली नाही. त्यामुळे संबंधीत अधिकाऱ्यांवर कारवाई करायची नसेल तर जनतेच्या भल्यासाठी आरोप आणि प्रश्न उपस्थित करणाऱ्या खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर कारवाई करा, अशी उपरोधीक मागणी पँथर पॉवर संघटनेचे मुंबई प्रदेशाध्यक्ष गणेश जाधव यांनी केली आहे.
हे ही वाचा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे अण् खा. संजय राऊतांवर भारी पडतायत डॉ. राधाकिशन पवार
खासदार संजय राऊत यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 3 डिसेंबर 2023 रोजी भ्रष्टाचारासंबंधी लेखी तक्रार दिली होती. या तक्रारीमध्ये म्हटले होते की, “सार्वजनिक आरोग्य विभागात पैशांची मागणी करण्यासाठी व पैसे जमा करून घेण्यासाठी एका उपसंचालक पदाच्या अधिकाऱ्याची खास नियुक्ती केली आहे. या अधिकाऱ्याकडून वसुल केलेले सर्व पैसे संबंधीत मंत्रीमहोदयांच्या कात्रज येथील खासगी शिक्षण संस्थेच्या कार्यालयात जमा केले जातात.” मात्र सदरच्या लेखी तक्रारीस जवळपास वर्ष होईल, मात्र अद्यापही त्या “उपसंचालक पदाच्या अधिकाऱ्यावर” कारवाई केलेली नाही. त्यामुळे सरकारला जनतेच्या पैशाचे काहीही देणेघेणे नसून सदरच्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला अभय दिल्याचे दिसून येत आहे.
हे ही वाचा महापालिकेत कोणत्याही कामासाठी पैसे मागितले तर थेट माझ्याकडे तक्रार करा : आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे
तसेच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील विधिमंडळाच्या नागपूर येथे 20 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या हिवाळी अधिवेशनात भर सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता की, “सार्वजनिक आरोग्य विभागातील डॉ. राधाकिशन पवार आणि मॅग्मोचे माजी अध्यक्ष डॉ. राजेश गायकवाड यांनी आरोग्य विभागातील 7 हजार लोकांना प्रत्येकी एक लाख रूपये जमा करायला सांगितले आहेत. त्यांच्यावर कारवाई होण्याची आवश्यकता आहे.” असा प्रश्न उपस्थित केला होता. परंतु भर सभागृहात सदरचा जवळपास 70 कोटी रूपये वसुलीचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित करून जनतेच्या पैशांची लूट थांबवण्याचा मानस होता. परंतु विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या प्रश्नाला हिवाळी अधिवेशनाचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दुर्लक्षित केले आहे का ? की संबंधीत अधिकाऱ्यांची चौकशी झाली असतानाही कारवाईस टाळाटाळ केली जात आहे का ? सदरच्या अधिकाऱ्यांचे निलंबन तीन महिन्यानंतरही का केले जात नाही ? की संबंधीत हिवाळी अधिवेशनाचे अध्यक्ष, मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री यांना जनतेच्या पैशाचे, विरोधी पक्षनेत्याच्या प्रश्नांचे आणि खासदारांच्या लेखी भ्रष्टाचाराच्या तक्रारीचे काहीही देणेघेणे नाही ? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. नेसल तर संबंधीत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर तर कारवाई करा, अशी उपरोधीक मागणी पँथर पॉवर संघटनेचे मुंबई प्रदेशाध्यक्ष गणेश जाधव यांनी केली आहे.
हे ही वाचा उपसंचालक डॉ. राधाकिशन पवारांकडून मागासवर्गीय अधिकारी-कर्मचाऱ्यांवर अन्याय
आश्रमशाळेतील बेकायदेशीर नेमणुका ठरवलेल्या 16 शिक्षकांना वेतन सुरू
“नामदे”वाच्या पायरीवर खरेदीच्या फायली