भाग एक : रणजित वाघमारे
आरोग्य मंत्र्यांना CM करायचं आहे. येत्या निवडणुकीत त्यांना पैशांची गरज आहे. पुणे सर्कल मधील सर्व जिल्हा शल्य चिकीत्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्रत्येकी 5 लाख रुपये, सर्व वैद्यकीय अधिक्षक आणि सर्व तालुका आरोग्य अधिकारी यांनी प्रत्येकी 1 लाख रूपये पाठवा, असा “स्विट मेसेज” बीडच्या भुमी पुत्राकडून त्या-त्या जिल्ह्यातील जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकीत्सकांमार्फत सर्व वैद्यकीय अधिक्षक आणि सर्व तालुका आरोग्य अधिकारी यांना दिला आहे. खुद्द आरोग्य मंत्र्यांच्या नावे पुणे सर्कलमधील पुणे, सातारा आणि सोलापूरमध्ये हा अजब प्रकार सुरू आहे. त्यामुळे बीडच्या भुमी पुत्राबाबत सार्वजनिक आरोग्य विभागात वेगळीच चर्चा सुरू आहे.
हे ही वाचा आरोग्य सहायक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाच्या पदोन्नतीसाठी दिड लाख रूपये रेटकार्ड
सध्या पुणे सर्कलमधील पुणे, सातारा आणि सोलापूर मध्ये बीडच्या भुमी पुत्राकडून चक्क आरोग्य मंत्र्यांच्या नावे “अर्थ” कारणाचा “स्विट मेसेज” फिरवला जात आहे. त्यांनी या 3 जिल्ह्यातील जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकीत्सक यांना फर्मान सोडले आहे की, “आरोग्य मंत्र्यांनी सूचना दिली आहे की, पुणे, सातारा आणि सोलापूर येथील कार्यरत सर्व जिल्हा शल्य चिकीत्सक, जिल्हा आरोग्य अधिकार, सर्व वैद्यकीय अधिक्षक आणि सर्व तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडून आरोग्य मंत्र्यांनी पैसे घ्यावयास सांगितले आहेत. त्यामुळे त्या-त्या जिल्ह्यातील सर्व जिल्हा शल्य चिकीत्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्रत्येकी 5 लाख रुपये तसेच सर्व वैद्यकीय अधिक्षक आणि सर्व तालुका आरोग्य अधिकारी यांनी प्रत्येकी 1 लाख रूपये तत्काळ पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत.” यासाठी बीडचा भुमी पुत्र आणि संबंधीत सर्व वसुलदार यांनी “स्विट मेसेज” असा कोडवर्डही ठरवला असून संबंधीत सर्वांना तत्काळ “स्विट मेसेज”ची पूर्तता करा. सर्वांनी WhatsApp कॉल करून माहिती द्या, असे फर्मान सोडले आहे.
हे ही वाचा MPSC मार्फत अधिकारी हजर होऊनही IEC चा पदभार कंत्राटी कर्मचाऱ्याकडे
यामध्ये पुणे विभागातील पुणे, सातारा आणि सोलापूर मध्ये 3 जिल्हा शल्य चिकीत्सक आणि 3 जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडून प्रत्येकी 5 लाख रूपये, 80 ते 100 वैद्यकीय अधिक्षक यांच्याकडून प्रत्येकी 1 लाख रूपये आणि 80 ते 100 तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून प्रत्येकी 1 लाख रूपये देण्याची सक्ती केली आहे. हा सर्व प्रकार चक्क आरोग्य मंत्र्यांच्या नावे सुरू आहे. आरोग्य मंत्री एकीकडे सार्वजनिक आरोग्य विभागाला शिस्त लावत आहेत. भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना निलंबीत करत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाचा कारभार सुरळीत सुरू असताना आरोग्य मंत्र्यांच्या नावे बीडच्या भुमी पुत्राकडून नाहक गैर(अर्थ)प्रकार सुरू असल्याचे अनेक वैद्यकीय अधिक्षक आणि तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. तसेच ज्यांच्याकडून ठरवलेली रक्कम दिली जाणार नाही, त्यांची जिल्हा बाह्य बदली करण्यात येईल, अशी धमकीवजा सुचना सर्वांना देण्यात आली आहे.
फक्त पुणे विभागातच २ कोटींची वसुली…
-पुणे, सातारा आणि सोलापूर मधील अनेक वैद्यकीय अधिक्षक आणि तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी इतर सर्कलमध्ये आणि इतर जिल्ह्यातील वैद्यकीय अधिक्षक, तालुका आरोग्य अधिकारी यांना याबाबत विचारना केली. परंतु इतर कोणत्याही जिल्ह्यात अथवा सर्कलमध्ये त्या-त्या वरिष्ठांनी आरोग्य मंत्र्यांच्या नावे असा कुठलाही प्रकार अथवा फतवा काढला नसल्याचे सांगितले. त्यामुळे पुणे विभागातच फक्त आरोग्य मंत्र्यांच्या नावे जवळपास 2 कोटी रूपयांची वसुली सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे. त्यामुळे या गैरप्रकाराकडे आरोग्य मंत्र्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी काही जिल्हा शल्य चिकीत्सक, काही जिल्हा आरोग्य अधिकारी, काही वैद्यकीय अधिक्षक आणि काही तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी केली आहे. तसेच यापूर्वी अनेक दिवे लावलेल्या बीडच्या भुमी पुत्रासह तीनही जिल्ह्यातील “स्वयंघोषीत” वसुलदारांवर आरोग्य मंत्र्यांकडून काय कारवाई होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भविष्यातील “डायरेक्टर” मीच
-आरोग्य मंत्र्यांना “अर्थ” पुरवठा केला की ते काहीही करायला तयार असतात, आरोग्य मंत्री आणि त्यांचा बंधु माझ्या खिशात आहेत. त्यामुळे या वसुलीच्या बदल्यात भविष्यात “डायरेक्टर” मीच होणार आहे, अशी उघड उघड चर्चा बीडच्या भुमी पुत्राकडून केली जात आहे. वास्तविक पाहता आरोग्य मंत्र्यांमुळे सार्वजनिक आरोग्य विभागाची गाडी रूळावर असून सर्वत्र आरोग्य सेवा सुरूळीत सुरू आहे. असे असताना काही वरिष्ठ अधिकाऱ्यांमुळे सार्वजनिक आरोग्य विभाग आणि आरोग्य मंत्री यांची नाहक बदनामी सुरू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे खुद्द आरोग्य मंत्री याकडे कधी लक्ष देणार आहेत ? अशी चर्चा आरोग्य विभागात सुरू आहे.
हे ही वाचा महिला व नवजात शिशु रुग्णालयात प्रथम रुग्ण व प्रथम कन्येचे समारंभपुर्वक स्वागत
महिला व नवजात शिशु रुग्णालयात प्रथम रुग्ण व प्रथम कन्येचे समारंभपुर्वक स्वागत
चुकीच्या आदेशान्वये डॉ. एस. पी. कुलकर्णी जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालयात ठाण मांडून