सोलापूर : प्रतिनिधी
420 : तत्कालीन नगर अभियंता तथा अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी नियमबाह्य पध्दतीने मक्तेदारांना नोंदणी प्रमाणपत्र दिली. अनंत कंन्स्ट्रक्शनचे प्रो. प्रा. गुरूप्रसाद विलास कुलकर्णी यांनी महापालिकेत वडिल नोकरीस असताना खोटा बाँड देऊन मक्तेदार नोंदणी प्रमाणपत्र मिळवले. गुरूप्रसाद कुलकर्णी यांचे वडिल विलास कुलकर्णी यांनी नियमबाह्य पध्दतीने मुलाच्या कामाची बिले अदा केली. या सर्वांनी महापालिकेची फसवणूक केली आहे. त्यामुळे या गैरप्रकारामध्ये एकमेकांना सहकार्य करणारे व महापालिकेची फसवणूक करणारे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, विलास कुलकर्णी आणि गुरूप्रसाद कुलकर्णी यांच्यावर 420 चा गुन्हा दाखल करा, अशी मागणी वंचीत बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे पश्चिम महाराष्ट्र संघटक अमित गायकवाड आणि जिल्हा संपर्क प्रमुख राजशेखर चंदनशिवे यांनी प्रशासक तथा आयुक्त शितल तेली-उगले यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे सोमवारी केली आहे.
तक्रारी निवेदनात म्हटले आहे की, अनंत कंन्स्ट्रक्शनचे प्रो. प्रा. गुरूप्रसाद विलास कुलकर्णी यांचे वडील विलास गुरूसिध्दप्पा कुलकर्णी हे सोलापूर महापालिकेच्या मुख्य लेखापाल कार्यालयात वरिष्ठ श्रेणीक लिपीक या पदावर कार्यरत आहेत. असे असताना गुरूप्रसाद कुलकर्णी यांनी महापालिकेला खोटा बाँड देऊन “मक्तेदारी” मिळवली आहे. तर तत्कालीन नगर अभियंता तथा अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी मक्तेदार गुरूप्रसाद कुलकर्णी यांना मक्तेदार नोंदणी प्रमाणपत्र देताना कोणत्याही कागदपत्रांची तपासणी व शहानिशा न करता मक्तेदार नोंदणी प्रमाणपत्र दिले आहे. दुसरीकडे गुरूप्रसाद विलास कुलकर्णी यांचे वडिल विलास गुरूसिध्दप्पा कुलकर्णी हे स्वत: सोलापूर महापालिकेच्या मुख्य लेखापाल कार्यालयात वरिष्ठ श्रेणीक लिपीक या पदावर कार्यरत असताना मुलास मक्तेदार नोंदणी प्रमाणपत्र घेताना सहकार्य केले. नियम अटी माहित असताना सदरचा प्रकार करण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे या प्रकरणात सदरचे सर्व अधिकारी-कर्मचारी व मक्तेदार दोषी आहेत. 420
हे ही वाचा Percentage | टक्केवारीतील पाचशे रूपये कमी दिल्याने अधिकारी नाराज
महापालिकेकडील विविध कामांचा मक्ता घेण्यासाठी मक्तेदार नोंदणी प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. परंतु संबंधीत मक्तेदाराचा नातेवाईक महापालिकेत शासकीय सेवेत असल्यास त्यांना विविध कामांसाठी मक्ता देता येत नाही. तसेच मक्तेदारांनाही महापालिकेत टेंडर भरता येत नाही. मक्तेदाराने एखाद्या कामाचा मक्ता घेताना स्वत:चा नातलग महापालिकेत कार्यरत नसल्याचे शपथपत्र शंभरच्या बाँडवर द्यावे लागते. असे असतानाही अनंत कंन्स्ट्रक्शनचे प्रो. प्रा. गुरूप्रसाद विलास कुलकर्णी यांनी त्यांचे वडिल विलास गुरूसिध्दप्पा कुलकर्णी हे सोलापूर महापालिकेच्या मुख्य लेखापाल कार्यालयात वरिष्ठ श्रेणीक लिपीक या पदावर कार्यरत असताना खोटे शपथपत्र महापालिकेला सादर केले आहे. या शपथ पत्रात त्यांनी “माझे नातलग महापालिकेत कार्यरत नाहीत” असे चक्क शंभरच्या बाँडवर लिहून दिले आहे. अशा पध्दतीने खोटे शपथपत्र सादर करून त्यांनी महापालिकेचे मक्तेदार प्रमाणपत्र मिळवले आहे. दुसरीकडे महापालिकेतील कोणतीही योजना व योजनांचा लाभ देताना संबंधीत अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी सादर कागदपत्रांची शहानिशा करणे, वस्तुस्थिती पडताळणे गरजेचे असते. त्यानंतर संबंधीत व्यक्तीला लाभ किंवा सोयी-सुविधा देणे गरजेचे आहे. परंतु मक्तेदार नोंदणी प्रमाणपत्र देताना तत्कालीन नगर अभियंता तथा अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी कोणतीही शहानिशा केली नाही. उद्या एखाद्या नागरिकाने घरकुल किंवा अपंगासाठीच्या सोयी-सवलतीसाठी खोटी कागदपत्रे जोडल्यास संबंधीत अधिकारी-कर्मचारी पडताळणी न करता लाभ देतात का ? खऱ्या अर्थाने लाभ मिळण्यास पात्र असलेले नागरिक लाभापासून वंचीत आहेत. मात्र दुसरीकडे अशा पध्दतीने गैरप्रकार सुरू आहेत. त्यामुळे अधिकारी फक्त कागदपत्रे गोळा करण्यासाठी नसून त्याची शहानिशा करण्यासाठी असतात. परंतु येथे मक्तेदार व अधिकारी यांचे संगणमत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी खोट्या बाँडव्दारे मक्तेदारी मिळवल्यानंतर संबंधीत मक्तेदाराने गेल्या तीन ते चार वर्षांपासून विविध झोन कार्यालयाअंतर्गत विविध कामे केली आहेत. 420
हे ही वाचा Contractor | मक्तेदारांनी मुदतीत काम न केल्यास होणार दंडात्मक कारवाई
दुसरीकडे याच कामांची बिले काढण्याचे काम गुरूप्रसाद कुलकर्णी यांचे वडिल विलास कुलकर्णी यांनी केले आहे. त्यामुळे विलास कुलकर्णी यांची पेन्शन बंद करावी, शिल्लक असलेले रजेचे पैसे देऊ नये, निकाल लागेपर्यंत पेन्शन थांबवावी आणि सदर प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत सध्या प्रलंबित असलेली कामाची बिले थांबवावी. आणि महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी या सर्व प्रक्रीयेत अनंत कंन्स्ट्रक्शनचे गुरूप्रसाद विलास कुलकर्णी, त्यांना मक्तेदार नोंदणी प्रमाणपत्र देणारे तत्कालीन नगर अभियंता तथा अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, बिले काढण्यास मदत करणारे गुरूप्रसाद कुलकर्णी यांचे वडील विलास कुलकर्णी, विविध कामांचे टेंडर देणारे झोन अधिकारी, कामांची मंजुरी देणारे अधिकारी, बिले काढणारे अधिकारी-कर्मचारी या सर्वांची चौकशी करून त्यांच्यावर 420 चा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वंचीत बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे पश्चिम महाराष्ट्र संघटक अमित गायकवाड आणि जिल्हा संपर्क प्रमुख राजशेखर चंदनशिवे यांनी प्रशासक तथा आयुक्त शितल तेली-उगले यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे सोमवारी केली आहे.