मुंबई : प्रतिनिधी
मराठा समाजाला आरक्षण द्यावयाचेच आहे तर विशेष अधिवेशनाचा घाट कशासाठी घालता? पुढची तारीख आम्हाला अजिबात मान्य नाही. कागदावर जे ठरले होते, त्याप्रमाणे 24 तारखेपर्यंत आम्हाला आरक्षण द्या. अन्यथा 24 डिसेंबरनंतर आंदोलनाचा वणवा पेटणार असून मनोज जरांगे-पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रस्ताव फेटाळला असून आरक्षण मिळाले नाही तर राज्यात .निवडणूका होऊ देणार नाही, अशी प्रतिक्रीया मनोज जरांगे-पाटील यांनी दिली आहे.
हे ही वाचा जरांगे पाटलांचे पुन्हा उपोषण मागे, सरकारला पुन्हा दिला अल्टिमेट
आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील पुन्हा राज्यातील काही जिल्ह्यांना भेटी देणार आहेत. त्यांच्या मराठा संवाद दौऱ्याला आजपासून पुन्हा सुरुवात होणार आहे. त्यांच्या आंदोलनाचा हा पाचवा टप्पा आहे. 20 ते 23 डिसेंबरपर्यंत ते विविध ठिकाणी हजेरी लावत मराठा आंदोलकांशी संवाद साधणार आहेत. दरम्यान त्यांच्या हस्ते बीड जिल्ह्यातील गेवराई कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही, तर निवडणुका होऊ देणार नाही. त्यामुळे आचारसंहिता हा विषयच राहत नाही, असे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा पाटील, काकडे, लोमटे यांना बडतर्फ करा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेब्रुवारी महिन्यात मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेण्याची घोषणा मंगळवारी विधानसभेत केली. त्यावेळी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल, त्यामुळे आरक्षण कसे मिळणार ? या प्रश्नावर जरांगे-पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत उत्तर दिले आहे. सरकार म्हणत आहे की, मागासवर्गीय आयोगाचा अहवाल फेब्रुवारी महिन्यात येणार आहे. तो अहवाल येणार का ? त्यात मराठा आरक्षण टिकणार का? हेही माहिती नाही. क्युरेटीव्ह पीटीशन ओपन कोर्टात टिकेल का ? हा आम्हाला प्रश्न पडला आहे. त्यामुळे पुन्हा आमचा विश्वासघात होईल, अशी शंका त्यांनी उपस्थित केली आहे.
हे ही वाचा फोन १०० टक्के चार्ज म्हणजे धोक्याची घंटा
पार्किंगच्या जागेतील उद्योग-व्यवसायास अभय देणाऱ्या मनपाच्या अधिकाऱी-कर्मचाऱ्यांवरही कारवाईची गरज