सोलापूर : प्रतिनिधी
आषाढी वारीसाठी (Aashadhi Vari) राज्यभरातून वारकरी बांधव पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे राज्य शासनाचे कर्तव्य आहे. त्यासाठी सक्षम जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याची गरज ओळखून जि. प. आरोग्य विभाग, सोलापूरच्या जिल्हा आरोग्य अधिकारीपदी (DHO) डॉ. संतोष नवले यांची नियुक्ती केली आहे.
हे ही वाचा NHM | लेखी आदेश देऊनही NHM आयुक्त धीरज कुमार यांच्या पत्राला केराची टोपली
पंढरपूर येथील आषाढी वारीकरिता आरोग्य मंत्री (Health Minister) तानाजी सावंत यांनी महाआरोग्य शिबिराचे (Health Camp) आयोजन केले आहे. या शिबिराच्या नियोजनासाठी व सेवा देण्यासाठी सक्षम असा जिल्हा आरोग्य अधिकारी उपलब्ध करुन देणे गरजेचे होते. त्याअनुषंगाने अत्यावश्यक बाब म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे येथील डॉ. संतोष गोविंद नवले यांच्याकडे पुढील आदेश येईपर्यंत कार्यभार सोपवण्यात आला आहे. तर जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे या पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. देवेंद्र रामराव जायभाये यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तसा आदेश 19 जुन 2023 रोजी आयुक्त डॉ. स्वप्निल लाळे यांच्या मान्य टिपणीनुसार आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबईचे सहसंचालक (अ व प्र) तुळशीदास सोळंके यांनी जारी केला आहे. बुधवारी, 21 जून रोजी ते पदभार स्विकारणार आहेत. DHO
सक्षम जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना सोलापूरचा अनुभव
डॉ. संतोष नवले यांनी यापूर्वी सोलापूर महापालिकेत आरोग्य अधिकारी पदी चांगल्या प्रकारे कामकाज केले आहे. त्यांनी राष्ट्रीय योजनांची व्यवस्थीतरित्या अंमलबजावणी करणे, महापालिकेच्या दवाखान्यांमधील प्रसुतीगृह अद्यावत करून गरीब व गरजू मातांना मोफत प्रसुतीची सोय उपलब्ध करून देणे, प्रसुतीचे प्रमाण वाढवणे, विविध शस्त्रक्रीयांची सुरवात करणे आदी कामकाज त्यांनी उत्तम प्रकारे केले आहे. DHO