भाग 6 : रणजित वाघमारे
सार्वजनिक आरोग्य विभागात बीडच्या भुमीपुत्राने ऑनलाईन बदल्या, प्रतिनियुक्त्या, समावेशन, पदोन्नती आदींमध्ये कहर केल्याच्या घटना यापूर्वी उजेडात आल्या आहेत. त्यानंतर आता पांढुरंगाच्या आषाढी वारीत येणाऱ्या भाविक वारकऱ्यांच्या चष्म्यावरही “डोळा” ठेवल्याची बाब उघड झाली आहे. यामध्ये गेल्या वर्षी (2023-24 मध्ये) आषाढी वारीतील वारकऱ्यांसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून 2 लाख चष्म्यांचे वाटप करण्यात आले होते. परंतु यातील वस्तुस्थिती “सत्ताकारण”च्या हाती लागली असून बिडच्या भुमीपुत्राने आषाढी वारीतील चष्म्यांचे वाटप सोलापूर शहरात झालेल्या आरोग्य शिबिरात केले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकीकडे आरोग्य विभागाकडून पंढरपूरात 14 लाख भाविक आले असून त्यातील 14 लाख भाविकांवर औषधोपचार करण्यात आल्याचे सांगण्यात आले, परंतु 14 लाख भाविक आले असताना फक्त 2 लाखांपैकी अर्ध्याच चष्म्यांचे वाटप का केले ? असा प्रश्न भाविकांना पडला आहे.
हे ही वाचा आरोग्य मंत्र्यांना CM करायचं आहे, आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी प्रत्येकी लाख रूपये पाठवा
घडलेली घटना अशी की, पंढरपुरात आषाढी वारीसाठी राज्यभरातील आणि इतर राज्यातील भाविक वारकरी येत असतात. त्यांच्या सेवेसाठी सार्वजनिक आरोग्य विभाग नेहमीच तत्पर असतो. त्यासाठी आरोग्य विभागाकडून आरोग्य सेवा, औषधोपचार, आरोग्य शिबिरे आदी सेवा मनोभावे पुरवली जाते. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या वर्षी आरोग्य मंत्र्यांच्या संकल्पनेतून आषाढी वारीत येणाऱ्या वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबिरे आणि 2 लाख चष्म्यांचे वाटप करण्याचा स्तुत उपक्रम राबविण्यात आला. याचे सर्व वारकरी सांप्रदायातून कौतुक झाले. परंतु दुसरीकडे बीडच्या भुमीपुत्राने आरोग्य मंत्र्यांच्या बंधुला खुष करण्यासाठी, सोलापूर शहरातील मध्य मतदार संघात भावी आमदार म्हणून प्रचार-प्रसिध्दी करण्यासाठी येथेही आषाढी वारीनंतर आरोग्य शिबिरे घेण्यास सांगितली. आणि सोलापूर शहरात झालेल्या या आरोग्य शिबिरात आषाढीत पांढुरंगाच्या पावन नगरीत आलेल्या वारकऱ्यांच्या चष्म्यांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे बीडच्या भुमीपुत्राने आरोग्य विभागातील महत्त्वाची पदे मिळवण्यासाठी पांढुरंगाचे पाय धरण्यापेक्षा आरोग्य मंत्री आणि त्यांच्या बंधूंच्या पायाशी लोळण घेणे पसंत केले आहे. ज्यामध्ये वारकऱ्यांच्या चष्म्यावर डाव साधला आहे. परंतु सदरची गोष्ट आरोग्य मंत्री आणि त्यांच्या बंधूंच्या लक्षात आली असती तर त्यांनी या गोष्टीला कधीही नकार दिला असता. त्यांनी स्वतंत्र चष्मे तयार करून मध्य मतदार संघात घेतलेल्या आरोग्य शिबिरात वाटप करण्यास सांगितले असते. परंतु बीडच्या भुमीपुत्राकडून आरोग्य मंत्री, त्यांचे बंधूच नाहीतर साक्षात पांढुरंग आणि तेथे आलेल्या वारकऱ्यांची फसवणूक केली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यंदाही आषाढी वारीतील आरोग्य शिबिरे, चष्मे वाटप, औषधे वाटप यावर आरोग्य मंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
हे ही वाचा हायटेक आषाढी वारीच्या नावाखाली छपाई आणि प्रसिध्दीसाठी नाहक हायटेक खर्च
तसेच येथे झोलल्या आरोग्य शिबिरात ग्रामीण, उपजिल्हा आणि इतर रूग्णालयात कार्यरत असणाऱ्या BAMS डॉक्टरांकडून तपासण्या व उपचार करण्यात आले. परंतु याच BAMS डॉक्टरांच्या समोर विशेषज्ञ म्हणून कीडनी तज्ञ, मेंदू तज्ञ, ह्दयरोग तज्ञ, अस्थिरोग तज्ञ अशा प्रकारच्या पाट्या ठेवण्यात आल्या होत्या. ज्यातून शिबिरात येणाऱ्या रूग्णांची एक प्रकारे दिशाभुल केली गेली आहे. चष्मे वाटप करतानाही अनेक वेळा डोळे न तपासता Age Group वरून अंदाजे चष्म्यांचे वाटप करण्यात आले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
औषधे, चष्मे खरेदीत गौडबंगाल
गेल्या वर्षी आषाढी वारीत औषध खरेदीसाठी जवळपास 1 कोटी 72 लाख रूपये निधी तर चष्मे खरेदीसाठी जवळपास 1 कोटी 25 लाख रूपये निधी प्राप्त होता. सदरची औषध आणि चष्मे खरेदीसाठीची टेंडर प्रक्रीया, त्यातील दर, यातील सप्लायर आणि वाटप हे सर्व संशयाच्या भोवऱ्यात आहे. कारण सदरची सर्व प्रक्रीया आरोग्य मंत्र्यांचे नाव पुढे करून पुण्यातून राबविली जाते. तर सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालय आणि त्यांचे अधिकारी-कर्मचाऱ्यांना फक्त हमाली काम करून घेण्यासाठी वापरले जात असल्याचे येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. बीडच्या भुमीपुत्राकडून सप्लायरची नावे देऊन त्यांच्याकडूनच खरेदी करावयास सांगितले जाते, असे येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
14 लाख भाविकांवर औषधोपचार मग 2 लाख चष्म्यांचे वाटप का नाही ?
पंढरपुरात आषाढी वारीत 14 लाख भाविक आल्याचे आरोग्य विभागाने जाहिर केले. त्यातील 14 लाख भाविकांवर औषधोपचार केल्याचेही आरोग्य विभागाने जाहिर केले. त्यामुळे पंढरपुरात आलेले सर्वच भाविक वारकरी आजारी होते का ? असा प्रश्न वारकरी सांप्रदायाकडून उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे 14 लाख भाविक आले असतील तर फक्त 2 लाख चष्म्यांचे वाटप करणे अवघड नव्हते. मग 2 लाखातील अर्ध्याच चष्म्यांचे वाटप पंढरपुरात का केले ? असा प्रश्न सर्वसामान्य जनता आणि वारकरी यांना पडला आहे. त्यामुळे यंदाच्या वारीतही खुद्द आरोग्य मंत्र्यांनी IEC, चष्मे खरेदी, औषध खरेदी, या सर्वांची खरेदी प्रक्रीया आणि दर याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
क्रमशः
हे ही वाचा ऑनलाईन बदल्यात ऑफलाईन पध्दतीने 75 कोटींची वसुली
आषाढी वारीत वारकऱ्यांना दर्जेदार आरोग्य सेवा द्या : सहसंचालक डॉ. राधाकिशन पवार
समावेशनाच्या नावाखाली वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून 45 ते 50 कोटींची वसुली