सोलापूर : प्रतिनिधी
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आमदारांकडून आलेल्या काही अधिकाऱ्यांच्या तक्रारी पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडल्या होत्या. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे बैठक आयोजित केली होती. मुख्यमंत्र्यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे आयोजित या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवलेंनी दांडी मारली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सुचना देऊनही डॉ. नवले हजर न राहिल्याने त्यांचा मुजोरपणा वाढत असल्याची चर्चा भाजपच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांमध्ये रंगली आहे. तर यावर कारवाईसाठी प्रस्ताव पाठविणार असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी सांगितले.
हे ही वाचा पालकमंत्री गोरेंच्या समोरच आमदार आवताडेंचा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवलेंवर टक्केवारीचा आरोप
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे आयोजित बैठकीस उपस्थित राहण्याच्या सुचना जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी संबंधीत 6 विभाग प्रमुखांना दिल्या होत्या. त्यामुळे या बैठकीस स्वतः जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम आदी उपस्थित होते. परंतु जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले आणि जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार हे जाणूनबुजून अनुपस्थित असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी प्रस्ताव पाठविणार असुन मुख्यमंत्री आणि पालकमंत्रीच यावर निर्णय देतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
हे ही वाचा टक्केवारीनंतर आरोग्यातील अधिकाऱ्यांनी दिली सप्लायरला ऑर्डर
यावर जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद म्हणाले, ३० जानेवारी 2024 रोजी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. यामध्ये सोलापूर जिल्हा परिषदचे आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले हे कामासाठी टक्केवारीची मागणी करतात, विना परवानगी कामे मंजूर केली आहेत, असे आरोप आमदार समाधान अवताडे यांनी केले होते. याशिवाय जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनीही 6 कोटींच्या निधीचा नियमबाह्य उपयोग केला आहे, याबद्दल चौकशी करावी अशी मागणी केली होती. त्यामुळे सदरच्या तक्रारी पालकमंत्री गोरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापर्यंत पोहचवल्या होत्या. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनीही बैठक आयोजित केली होती. परंतु डॉ. संतोष नवले आणि नरेंद्र पवार यांचा मुजोरपणा कायम दिसून आला. त्यामुळे त्यांच्यावर मुख्यमंत्री आणि पालकमंत्री काय कारवाई करणार आहेत ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्र्यांसमोर जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तोंडघशी
मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे आयोजित बैठकीदरम्यान डॉ. संतोष नवले आणि नरेंद्र पवार यांचा विषय हाती घेत हे दोघे कुठे आहेत ? असा प्रश्न उपस्थित करताच जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम हे डॉ. नवले आणि गोरे यांच्यामुळहे तोंडघशी पडले. त्यांना नाईलाजास्तव गैरहजर असल्याचे सांगावे लागले. दुसरीकडे 5 दिवसांपूर्वी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी डॉ. संतोष नवलेंना टक्केवारीच्या आरोपावरून चांगलेच फैलावर घेतले होते. मात्र यानंतरही डॉ. नवले यांच्यात कोणताच बदल झाला नसून ते मुख्यमंत्र्यांच्या बैठकीस गैरहजर राहिले. त्यामुळे मुख्यमंत्री आणि पालकमंत्री अशा निगरगठ्ठ अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार आहेत ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा उपसंचालक डॉ. राधाकिशन पवारांकडून मागासवर्गीय अधिकारी-कर्मचाऱ्यांवर अन्याय
MPSC मार्फत अधिकारी हजर होऊनही IEC चा पदभार कंत्राटी कर्मचाऱ्याकडे
IAS CEO यांनी घेतले जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून साडेतीन हजार रूपये