सोलापूर : प्रतिनिधी
सांख्यिकी संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सांख्यिकी संवर्गातील कामाशिवाय अन्य संवर्गातील कामे देऊ नये, असे वरिष्ठ कार्यालयातील वरिष्ठांचे 25 जुलै 2018 रोजीचे लेखी परिपत्रक आहे. असे असतानाही सांख्यिकी अन्वेषक एस. डी. काकडे यांनी गेली अनेक वर्षे PCPNDT चे कामकाज पाहिले आहे. त्यामुळे वरिष्ठांचा आदेश डावलून सांख्यिकी व्यतिरिक्त गैरप्रकारे इतर कामकाज पाहणाऱ्या एस. डी. काकडेंना बडतर्फ करा, अशी मागणी आमाजिआ उपसंचालक डॉ. आर. टी. वाघमारे यांच्याकडे शिवसेना शिंदे गटाचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मुस्ताक शेख यांनी केली आहे.
हे ही वाचा महिला व नवजात शिशु रुग्णालयात प्रथम रुग्ण व प्रथम कन्येचे समारंभपुर्वक स्वागत
राज्य आरोग्य माहिती व जीवनविषयक आकडेवारी कार्यालय (आमाजिआ) चे उपसंचालक डॉ. आर. टी. वाघमारे यांच्याकडे जिल्हाध्यक्ष मुस्ताक शेख यांनी दिलेल्या लेखी तक्रारी निवेदनात म्हटले आहे की, तत्कालीन आमाजिआ चे उपसंचालक डॉ. तानाजी एच. माने यांनी 25 जुलै 2018 रोजी लेखी परिपत्रक जारी केले आहे. त्या पत्रात स्पष्ट उल्लेख केला आहे की, सांख्यिकी संवर्गातील कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना सांख्यिकी संवर्गातील निर्धारीत कामाव्यतिरिक्त अन्य संवर्गातील कामे व प्रशासकिय विभागातील लेखा व आस्थापना कार्यभार देण्यात आलेला असल्याने सांख्यिकी संवर्गातील कामावरून तक्रारी या कार्यालयास प्राप्त होत आहेत.
हे ही वाचा चुकीच्या आदेशान्वये डॉ. एस. पी. कुलकर्णी जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालयात ठाण मांडून
यास्तव या कार्यालयाचे अधिपत्याखालील सांख्यिकी अधिकारी गट-ब व सांख्यिकी अन्वेषक, सांख्यिकी सहाय्यक व सांख्यिकी पर्यवेक्षवः गट-क संवर्गातील अधिकारी य कर्मचाऱ्यांना सांख्यिकी संवर्गा व्यतिरिक्त अन्य कामे देण्यात आल्याने सांख्यिकी संवर्गातील कामे होत नसल्याने त्याबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल वरिष्ठ कार्यालयास वेळेत सादर करणे शक्य होत नाही. तसेच एकंदरीत सांख्यिकी संवर्गातील सांख्यिकी विषयक आकडेवारीचे कामाबाबत उदासिनता दिसून येते. बरेच कार्यालयामध्ये सांख्यिकी संवर्गीय कर्मचारी हे प्रशासकिय विभागातील लिपीक संवर्गीय (लेखा व आस्थापना विषयक) कामे करीत असल्याचे प्राप्त तक्रारीवरुन दि. १५.०६.२०१७ रोजीचे जिल्हा शल्यचिकित्सक सामान्य रुग्णालय उस्मानाबाद रोजीच्या लाचखोरीच्या प्रकरणावरुन स्पष्ट होत आहे. त्यास अनुसरुन या कार्यालयाने दिनांक २१/०६/२०१७ रोजीचे परिपत्रक सांख्यिकी अधिकारी, सांख्यिकी अन्वेषक, सांख्यिकी सहाय्यक व सांख्यिकी पर्यवेक्षक या संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सांख्यिकी संवर्गाचेच कामे देण्यात यावेत. पंरतु बरेच कार्यालय प्रमुखांनी दिनांक २१/०६/२०१७ च्या परिपत्रकाची अंमलबजावणी केलेली दिसत नाहीत, हे दिनांक ०९/०७/२०१८ रोजीच्या जिल्हा शल्यचिकित्सक सामान्य रुग्णालय औरंगाबाद येथील लाचखोरीच्या प्रकरणावरुन स्पष्ट होते.
यास्तव सर्व कार्यालय प्रमुखांना सुचित करण्यात येते की, सांख्यिकी अधिकारी, सांख्यिकी अन्वेषक, सांख्यिकी सहाय्यक व सांख्यिकी पर्यवेक्षक या संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सांख्यिकी संवर्गाचेच कामे देण्यात यावे. सांख्यिकी संवर्गाव्यतरिक्त अन्य कार्यालयीन कामकाजाची कामे सोपविण्यात येऊ नयेत. या सांख्यिकी संवर्गातील कामा व्यतिरिक्त अन्य कामे सांख्यिकी संवर्गातील अधिकारी यांचेमार्फत करुन घेत असल्यास सदरचे कार्यालयास सांख्यिकी विषयक सांख्यिकी संवर्गातील अधिकारी/कर्मचाऱ्यांची आवश्यकता नाही, असे गृहीत धरुन सदरील अधिकारी/कर्मचाऱ्यांची अन्यत्र पदस्थापना देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल व सदर बाबीस कार्यालय प्रमुख जबाबदार राहतील, यांची नोंद घ्यावी. असे लेखी परिपत्रक तत्कालीन आमाजिआ चे उपसंचालक डॉ. तानाजी एच. माने यांनी 25 जुलै 2018 रोजी जारी केले आहे.
तरी सांख्यिकी अन्वेषक एस. डी. काकडे यांना नियुक्ती अधिकाऱ्यांनीच लेखी दिलेल्या सूचना मान्य नाहीत. त्यांनी वरिष्ठांच्या आदेशाला डावलले आहे. परिपत्रकाच्या आदेशाचे त्यांनी पालन केले नाही. सांख्यिकी सहायक यांना आकडेवारीशिवाय व त्या पदाला नेमूण दिलेल्या कामाशिवाय इतर कामे देऊ नये, असे असताना काकडे यांनी स्वतःसुध्दा PCPNDT चे काम नाकारले नाही, त्यामुळे यामध्ये काकडेंनी आजपर्यंत गैरप्रकारे केलेल्या PCPNDT कामकाजाची चौकशी करावी, त्यांचे प्रमोशन थांबवावे आणि गैरप्रकारे केलेल्या कामाबद्दल त्यांचे निलंबन करावे आणि चौकशी अंती बडतर्फही करावे, अशी मागणी आमाजिआ उपसंचालक डॉ. आर. टी. वाघमारे यांच्याकडे शिवसेना शिंदे गटाचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मुस्ताक शेख यांनी लेखी निवेदनाव्दारे केली आहे.
हे ही वाचा सोनोग्राफी सेंटर परवानगी : सिव्हील सर्जनसाठी काकडेंनी मागितले 70 हजार रूपये