सोलापूर : प्रतिनिधी
Buy Medicine : जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद् यांनी डिपीडीसी (DPDC) फंडातून औषध खरेदीसाठी नुकतीच जाहिरात प्रसिध्द केली आहे. परंतु यातील नियम व अटी या हितसंबंधातील औषध विक्रेत्याच्या हिताच्या आहेत. या नियम व अटी सर्व विक्रेत्यांसाठी सर्वसमावेशक अशा नाहीत. यामुळे ठराविक औषध (Medicine) विक्रेता व संबंधीत अधिकारी यांच्या फायद्याचे हे औषध खरेदी (Buy Medicine) प्रक्रीयेचे टेंडर (Tender) रद्द करून पुन्हा सर्वसमावेशक प्रक्रीया राबवा, अन्यथा येत्या आठ दिवसानंतर आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या मंत्रालयातील कार्यालयात ठिय्या आंदोलन करू, असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर यांना दिलेल्या निवेदनात वंचीत बहुजन आघाडीचे अमित गायकवाड यांनी दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद् यांनी DPDC फंडातुन औषध खरेदि करनेकामी दैनिक लोकमत वृतपत्रातुन ०३/०३/२०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. या जहिरातीतील अटी व शर्तिनुसार औषध खरेदि करनेकामी प्रथमतहा मा. जिल्हा आरोग्य अधिकारी (DHO) यांनी औषध खरेदि करनेकामी ई-टेंडर प्रक्रिया राबविली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. ई-टेंडर प्रक्रिया राबविन्याचा उद्देश हा जास्तीत जास्त उत्पादक, विक्रेते यांच्यापर्यंत ही माहीती जावी आणि अत्यंत चांगल्या दर्जाची औषधी अत्यंत वाजवी दरात मिळावित हा असतो. परंतु या ठीकाणी या सर्व उद्देशाला हरताळ फासल्याचे दिसून येत आहे. या टेंडर प्रक्रियेद्वारे अत्यंत मोजक्या उत्पादक, विक्रेते यांना सहभागी होता येईल अशा अटी व शर्ति नियोजनपुर्व व जाणिवपुर्वक टाकल्या आहेत. जेनेकरुन जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या मर्जीतील उत्पादक, विक्रेते यांनाच यात सहभागी होता येईल. या प्रक्रियेत विशिष्ट व्यक्तीला फायदा होणेकामी उल्लेख केलेल्या जाचक अटी पुढील प्रमाणे
१) अर्नेस्ट मनी डिपोजिट हे रूपये ७.५ लक्ष ठेवले आहे.
२) सहभागी होण्यासाठी उत्पादकच असणे आवश्यक आहे.
३) वार्षिक उलाढाल ही ३० कोटी रूपये असणे आवश्यक आहे.
वर उल्लेख केलेल्या अटी व शर्तिनुसार फक्त उत्पादकच टेंडर भरू शकणार आहेत व वार्षिक उलाढालही ३० कोटी असणे आवश्यक आहे. यामुळे फक्त विशिष्ट वर्गाचाच फायदा होइल आणि शासनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होइल. अत्यंत प्रमाणिक परंतु आर्थिक उलाढाल कमी असलेला व उत्पादक नसलेला व्यक्ति या प्रक्रियेत सहभागी होवू शकणार नाही. आणि निकोप स्पर्धा होणार नाही. तसेच शासन दरापेक्षा किंवा बाजार भावापेक्षाही चढ्या दराने निविदा येवू शकतात आणि या पूर्वीच्या खरेदी वेळीही अशाच प्रकारच्या अटी व शर्ति नमूद केल्याने सर्वसामान्य विक्रेते यात सहभागी होवू शकले नाहीत. मागील वर्षी या प्रक्रियेत पात्र झालेले Cian Pharma यांचेकडून खरेदी करण्यात आली. यावर्षीही त्याच कंपनी कढुनच खरेदी करण्याचा घाट घातला आहे. म्हणुनच अशा जाचक अटी उल्लेखलेल्या आहेत. संबंधित Cian Pharma चे मालक श्री. सारडा हे असून त्यांच्या नावे श्री रवि जाधव हे पूर्ण प्रक्रिया राबवितात. श्री रवि जाधव हे तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितल जाधव यांचे बंधू आहेत. म्हणजेच तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितल जाधव हेच पूर्ण प्रक्रिया हे त्याना फायदा होइल अशाच प्रकारे राबवित होते. आणि या भ्रष्ट प्रक्रियेत मागील वर्षी त्यांच्याबरोबर सामिल असलेले श्री सुनील लिंबोळे व इतर सर्वजणच या वर्षीही प्रक्रिया राबवित आहेत. या सर्व भ्रष्ट कार्यपद्धतिमुळे व भ्रष्ट साखळीमुले मागील वर्षी शासकीय दरापेक्षा व बाजारभावपेक्षा पाच ते सहा पट जास्त दराने औषधी खरेदी केली आहेत. यासाठी खरेदी केलेल्या औषधीचे दर आणि त्याच औषधीचे बाजारभावाची कीमत किवा HLL, Karnat यांचेकडील त्या औषधीचे RC वरील दर पाहिले असता व तुलना केली असता किती पटीत औषधीची कीमत जादाची लावली आहे आणि या सर्वानी मिळून किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे, हे लक्षात येईल. त्यामुळे या जाचक अटी तर रद्द कराव्यात आणि संपुर्ण प्रक्रिया पुन्हा राबवावी. तसेच जाणिव पुर्वक एकमेकांच्या साथीने भ्रष्टाचार करणारे तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितल जाधव, त्यांचे बंधू श्री. रवि जाधव, Cian Pharma चे मालक श्री सारडा, सुनील लिंबोळे आदि सर्वांची चौकशी होवून कायदेशीर कारवाई करावी. तसेच सदरची औषध खरेदी प्रक्रीयेचे टेंडर रद्द करून पुन्हा सर्वसमावेशक प्रक्रीया राबवा, अन्यथा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या मंत्रालयातील कार्यालयात ठिय्या आंदोलन करू, असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर यांना दिलेल्या निवेदनात वंचीत बहुजन आघाडीचे अमित गायकवाड यांनी दिला आहे.
Buy Medicine