सोलापूर : प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे NSS विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे यांना लोकसेवा वसुंधरा गौरव पुरस्कार (Lokseva Vasundhara Gaurav Award) नुकताच प्राप्त झाला. पुण्यातील पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लोकसेवा प्रतिष्ठान, हरित मित्र परिवार आणि दूरदर्शन केंद्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार देण्यात आला आहे.
पुण्यातील एका समारंभात हा पुरस्कार डॉ. राजेंद्र वडजे यांनी स्वीकारला. विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी याबद्दल अभिनंदन करीत डॉ. वडजे यांचा सन्मान केला. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे, कुलसचिव योगिनी घारे आदीचीं प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रभारी कुलगुरू डॉ. कामत म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील NSS विभागाकडून गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले आहे. त्यामुळेच आज विद्यापीठातील कॅम्पस हिरवाईने नटलेला आहे. आणि या पध्दतीने डॉ. वडजे यांनी वृक्ष संवर्धन केल्यामुळेच त्यांना (Lokseva Vasundhara Gaurav Award) हा पुरस्कार प्राप्त देण्यात आला आहे.
हे ही वाचा Today Horoscope In Marathi 6 Oct 2023 | आजचे राशीभविष्य
पालकमंत्री पदाचा तिढा सुटला; पुण्याचे पालकमंत्री अजित दादा, तर सोलापूरचे चंद्रकांत दादा