पुणे : प्रतिनिधी
दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल जेवढे दोषी आहे, त्यापेक्षा जास्त दोषी हे इंदिरा आय. व्ही. एफ. सेंटर-पुणे आहे. त्यांच्या चुकीच्या उपचारामुळे पुण्यातील तनिषा भिसे या महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ‘इंदिरा आयव्हीएफ’च्या सर्व सेंटर्सवर तत्काळ बंदी आणून तनिषा भिसेंना न्याय द्या, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष राम बोरकर आणि आणि दिलीपसिंग विश्वकर्मा यांनी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली आहे.
हे ही वाचा सर्वांगीण निरोगी महाराष्ट्रासाठी आरोग्य विभागाला सर्वोत्परी सहकार्य करणार : उपमुख्यमंत्री अजित पवार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष राम बोरकर यांनी लेखी तक्रारीत म्हटले आहे की, पुणे स्थित तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झालेला आहे. प्रथमदर्शनी तनिषा भिसे या गर्भवती राहिल्यास त्यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो, यांची कल्पना असून सुद्धा इंदिरा आय. व्ही. एफ. सेंटरने पैशांच्या हव्यासापोटीच त्यांना कृत्रिमरीत्या गर्भ धारणा करून त्यांना वाऱ्यावर सोडून दिले आहे. हे कृत्य करून तनिषा भिसे यांचा जीव त्यांनी घेतला आहे. त्यामुळे सरोगसी (नियमन) कायदा 2021 व सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान (नियमन) कायदा 2012 अंतर्गत इंदिरा आय. व्ही. एफ. सेंटर, विमाननगर पुणे यांचे रजिस्ट्रेशन झाले आहे का ? याचीही तपासणी करावी. सदरचे सेंटर हे बेकायदेशीर चालू असून त्याला परवानगी नसल्याची माहिती आमच्याकडे आहे. तसेच प्रजनन करताना रुग्णाच्या सर्व तपासण्या/चाचण्या करून घेणे आवश्यक असताना संबंधित डॉक्टरांनी त्या केल्या होत्या का ? सर्व चाचण्या/तपासण्या केल्या असतील तर त्यामध्ये तनिषा भिसे यांना पूर्वी झालेला आजार डॉक्टरांना कसा समजला नाही ? संबंधित सेंटरमध्ये सर्व डॉक्टर्स हे शासनाच्या नियमानुसार तज्ञ आहेत की नाही ? याची चौकशी करावी. तसेच महाराष्ट्रातील सर्व इंदिरा आय. व्ही. एफ. सेंटरची शासनाच्या समितीमार्फत चौकशी करावी आणि दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष राम बोरकर आणि दिलीपसिंग विश्वकर्मा यांनी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली आहे. तसेच सदरची कारवाई न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
हे ही वाचा दिनानाथ मंगेशकर रूग्णालय वादग्रस्त प्रकरण; चौकशी समितीचे अध्यक्षच वादाच्या भोवऱ्यात
राज्यात “Women In Leadership Roles”मध्ये…
चौकशी समितीकडून कोंडेकर यांचा अहवाल सादर; आठ दिवसात कारवाईचे संकेत