-आरोग्य मंत्र्यांचे दुर्लक्ष
सोलापूर : विशेष प्रतिनिधी
District Health Officer : आरोग्य मंत्री (Health Minister) तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी 18 जणांवर कारवाई करण्यासाठी पाठवलेल्या पत्रावर अद्याप कारवाई नसणे, उपसंचालकांनी 102 मधील वाहनचालकांबाबत दिलेल्या आदेशाचे उशिरा पालन करणे, प्रत्येक तक्रारी अर्ज किंवा चौकशी समिती नेमल्यानंतर वरिष्ठ कार्यालयाकडून मार्गदर्शन मागवणे, मार्च अखेरचा निधी अपुरा खर्च करणे, 15व्या वित्त आयोगातील खरेदीत विलंब होणे अशा एक ना अनेक कामकाजामध्ये सध्या दिरंगाई होत आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा “सक्षम जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या प्रतिक्षेत” (District Health Officer) असल्याची चर्चा आरोग्य विभागासह जिल्हा परिषदेत सुरू आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रांचे (PHC) प्रस्ताव वेळेत न पाठवने व इतर विविध कारणांसाठी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी जि. प. आरोग्य विभागाचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांचे डिसेंबर 2022 मध्ये निलंबन (suspend) केले होते. त्यानंतर त्यांच्या रिक्त पदी प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी एकाच दिवशी सुरवातीला डॉ. बिरप्पा दुधभाते व त्यानंतर डॉ. सोनिया बागडे यांचा आदेश काढला. यानंतर डॉ. सोनिया बागडे यांनी या पदाचा पदभार स्विकारला. आरोग्य विभागात नेहमीप्रमाणे राजकारण (politics), कुरघोड्या सुरू असल्याने येथील जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना (DHO) कामकाज करणे अवघड जात आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांनी तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांची तक्रार (complaint) केली होती. तसेच विविध तक्रारीच्या अनुषंगाने डॉ. जाधव यांचे निलंबन झाले. त्यानंतर काळजे यांनी डॉ. जाधव यांच्याशी संबंधीत 18 जणांची तक्रार आरोग्य मंत्र्यांकडे केली होती. आरोग्य मंत्र्यांनी या पत्रावर शेरा मारत कारवाईचे आदेश प्र. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे यांना दिले होते. परंतु डॉ. बागडे यांनी 4 महिने चौकशी (inquiry) सुरू ठेवली. जिल्हाप्रमुख काळजे यांच्यासमोर तक्रारदारांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांची चौकशी पार पडली. परंतु कारवाई मात्र अद्यापर्यंत कोणावरही झाली नसून आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या आदेशाला आणि जिल्हाप्रमुख काळजे यांच्या तक्रारी अर्जाला डॉ. बागडे यांच्याकडून केराची टोपली दाखवण्यात आली आहे. यातील प्रतिनियुक्ती रद्द केलेल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावून त्यांच्याकडून डॉ. बागडे काम करून घेतात. माध्यम अधिकारी म्हणून रफिक शेख हे आहे तिथेच कार्यरत आहे. माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. अनिरूध्द पिंपळे, कंत्राटी जिल्हा लेखा व्यवस्थापक वैशाली थोरात, सुनिल लिंबोळे, डॉ. इरफान सय्यद, डॉ. संतोष जोगदंड, डॉ. श्रीकांत कुलकर्णी, गजेंद्र कुमठेकर, केदार गद्दी, निखील राऊळ, समिर शेख आदींवर कोणतीही कारवाई केली नाही. प्रत्येक कामकाजामध्ये चौकशी केली आहे, मार्गदर्शन मागवले आहे, वरिष्ठांकडे अहवाल पाठवला आहे, वरिष्ठ कार्यालयाकडून मार्गदर्शन मागवले आहे, अशा पध्दतीने प्र. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे यांच्याकडून कामकाज सुरू आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा “सक्षम जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याच्या प्रतिक्षेत” असल्याचे दिसून येत आहे.
फोटो : प्रतिनियुक्ती रद्द केल्यानंतरही प्र. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे यांच्या आदेशाने “त्याच टेबल”वर मुख्यालयात येऊन काम करताना गजेंद्र कुमठेकर.
चौकशीनंतर शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख शांतच
शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे तक्रार दिली. आरोग्य मंत्र्यांनी त्यावर शेरा मारत कारवाईचे आदेश दिले. 4 महिन्यानंतर यावर चौकशी झाली. मात्र चौकशीनंतर दोन महिने झाले तरी यातील कारवाई कोणावरच झाली नाही. दरम्यानच्या काळात एका नर्सेस संघटनेने व तक्रारीवरून चौकशी सुरू असलेल्या कर्मचाऱ्यांनी काळजे यांच्याविरोधात भूमिका घेतली. चौकशीदरम्यान ज्यांनी काळजे यांच्या विरोधात भूमिका घेतली होती, त्यांनी तक्रारी अर्जातील सह्या आपल्या नसल्याचे सांगत पळवाट काढली. परंतु चौकशीनंतर 18 जणांवर कारवाई का नाही ? याबाबत मात्र शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख शांतच आहेत. त्यामुळे शहर-जिल्हयात वेगळीच चर्चा होत आहे. District Health Officer
आरोग्य मंत्र्यांचे दुर्लक्ष
गेल्या 6 महिन्यांपासुण पुणे विभागातील पुणे, सोलापूर आणि सातारा या तिन्ही ठिकाणी सध्या प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांवर कामकाज सुरू आहे. या तिन्ही ठिकाणी सक्षम व कायमस्वरूपी जिल्हा आरोग्य अधिकारी देणे गरजेचे आहे. गेल्या 6 महिन्यात राज्यातील प्रधान सचिव, आयुक्त, उपसंचालक, जिल्हा शल्यचिकीत्सक, मनपा आरोग्य अधिकारी यांच्या नियुक्तींचे आदेश काढण्यात आले आहेत. मात्र पुणे विभागातील तिन्ही जिल्ह्यांचा कारभार प्रभारींवर सुरू आहे. परंतु याकडे आरोग्य मंत्र्यांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.
हे ही वाचा MD Drugs | सोलापूरात 116 कोटी रूपये किंमतीचा मेफेड्रोन (एमडी) अंमली पदार्थांचा साठा जप्त