सोलापूर : प्रतिनिधी
येथील तांदळवाडी (ता. बार्शी) गावातील स्वतःच्या सोयाबीन पिकाची मळणी करत असताना महिलेच्या डोक्याला बांधलेला स्कार्प हा मळणी यंत्रात अडकला. परिणामी मळणी यंत्रात केस अडकल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला असून ती जागीच ठार झाल्याची दुदैवी घटना शुक्रवार घडली.
हे ही वाचाEknath Khadse यांना 137 कोटींच्या दंडाची नोटीस
नंदा भास्कर गरड (वय 61, रा. तांदळवाडी, ता. बार्शी) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, भानुदास बापूराव गरड (वय 59) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 20 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी भास्कर गरड यांच्या शेतात सोयाबीन मळणीसाठी यंत्र आले होते. त्यासाठी नंदा भास्कर गरड व त्यांचा मुलगा रामराजे हे स्वतःच्या शेतात गेले असताना मळणी यंत्र चालू केले. नंदा गरड यांनी मळणी यंत्र चालू असताना त्या मळणी यंत्राच्या खाली पडलेले सोयाबीन पिकांचे दाणे गोळा करत हात्या. यावेळी त्यांच्या डोक्यावर बांधलेला स्कार्प व डोक्याचे केस हे ट्रॅक्टर व मळणी यंत्रात अडकले. नंतर त्यामध्ये डोकेही अडकले. परिणामी नंदा गरड यांच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत पांगरी पोलिसात ठाण्यात अकस्मत मृत्यूची नोंद होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपात्रे व पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार काशीद यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेहास शवविच्छेदनसाठी पांगरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल शब्बीर शेख करत आहेत.
हे ही वाचा अखेर Drug Mafia Lalit Patil मुंबई पोलिसांच्या हाती