भाग 5 : रणजित वाघमारे
आरोग्य विभागातील बदल्यांमध्ये कोणाचीही शिफारस चालणार नाही. बदल्यांमधील “अर्थकारण” थांबवायचे आहे, असे म्हणत आरोग्य मंत्र्यांनी 22 सप्टेंबर 2022 मध्ये ऑनलाईन बदल्याचे धोरण जाहीर केले. या धोरणाचे स्वागत आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केले. परंतु यानंतरही बीडच्या भुमीपुत्राकडून ऑनलाईन बदल्यात ऑफलाईन पध्दतीने जवळपास 75 कोटींची वसुली करण्यात आली आहे. अशा पध्दतीने सार्वजनिक आरोग्य विभागात स्वयंघोषीत वसुलदारांकडून वेळोवेळी आरोग्य मंत्र्यांच्या नावे लुट सुरूच असल्याची प्रकरणे उघडकीस येत आहेत. बीडच्या भुमीपुत्राकडून पारदर्शकतेच्या नावाखाली ऑनलाईन बदल्यात ऑफलाईन पध्दतीने भ्रष्टाचाराचा कळस गाठल्याचे चित्र समोर आले. मात्र या सर्व घाडामोडीनंतरही आरोग्य मंत्र्यांकडून त्यांना पाठीशी का घातले जात आहे ? याची चर्चा सार्वजनिक आरोग्य विभागात राज्यभर सुरू आहे.
हे ही वाचा आरोग्य मंत्र्यांना CM करायचं आहे, आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी प्रत्येकी लाख रूपये पाठवा
सार्वजनिक आरोग्य विभागातील PG झालेल्या जवळपास 900 हून अधिक जणांच्या ऑनलाईन बदल्या जून 2023 मध्ये करण्यात आल्या. ज्यामध्ये यातील डॉक्टरांना ग्रामीण, उपजिल्हा किंवा जिल्हा रुग्णालयात नियुक्ती देणे बंधनकारक आहे. मात्र यातील डॉक्टरांना सोयीच्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रे येथे नियुक्त्या देण्यात आल्या. नियुक्त्या देण्यासाठी यामध्येही बीडच्या भुमीपुत्राकडून आरोग्य मंत्र्यांचे नाव पुढे करत प्रत्येकी 5 लाख रूपये रेट ठरवला. तर ज्यांना नको त्या ठिकाणी नियुक्ती मिळाल्या आहेत, त्यांच्याकडून परत 5 लाख रूपये वसुल करून हव्या त्या ठिकाणी नियुक्त्या दिल्या गेल्या. अशा पध्दतीने ऑनलाईन बदल्यातही ऑफलाईन मार्गे बिडच्या भूमीपुत्राकडून आरोग्य मंत्र्यांच्या नावे जवळपास 75 कोटींपर्यंत वसुली करण्यात आली. यामध्ये किरकोळ रकमेचे App कोट्यावधी रूपयांना खरेदी करून यामध्येही भष्ट्राचार झाल्याची चर्चा आहे.
हे ही वाचा आरोग्य मंत्र्यांच्या CM पदासाठी स्वयंघोषीत वसुलदारांकडून 2 कोटींचा “Sweet Message” परस्पर व्हायरल
या बदल्यात प्रत्येकांना त्यांची ऑर्डर त्या-त्या डॉक्टरांच्या मेल आयडी वर पाठवल्या गेल्या. यामध्ये त्या-त्या विभागातील उपसंचालकांनीही वसुलीसाठी हातभार लावला. वास्तविक पाहता आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात आरोग्य विभागाने मोठा निर्णय घेतला होता. ज्यामध्ये कोणाचीही शिफारस चालणार नाही, बदल्यांमधील अर्थकारण थांबावे, ज्यांना बदली करुन घ्यावयाची आहे, त्याने स्वतः या अॅपवर 3 पर्याय भरावयाचे होते. त्यामधून मेरिटवर डिजिटल पद्धतीने बदली होणार असल्याचे खुद्द आरोग्य मंत्र्यांनी सांगितले होते. मात्र ऑनलाईन बदल्यात ऑफलाईन पध्दतीने सर्व मॅनेज करून संबंधीतांना हव्या त्या ठिकाणी बदल्या करून दिल्या. मात्र आरोग्य मंत्र्यांपर्यंत यातील 30 टक्के रक्कम तरी पोहचली आहे का ? याचा शोध घेण्याची गरज असल्याची चर्चा सार्वजनिक आरोग्य विभागात राज्यभर रंगली आहे.
बीडच्या भुमीपुत्रामुळे “आरोग्य मंत्री” आणि “ईडी”चे समीकरण जुळणार
समावेशन, बदल्या, प्रतिनियुक्त्या, प्रमोशन याबरोबरच आषाढी वारी, आरोग्य शिबिरे, औषध खरेदी, IEC खरेदी, सर्जीकल खरेदी, फर्निचर खरेदी, कॉम्प्युटर खरेदी, डायग्नोस्टिक खरेदी आदी सर्वांमध्येही बीडच्या भुमीपुत्राने सावळागोंधळ करून ठेवला आहे. ज्यामध्ये सर्व ठिकाणी आरोग्य मंत्र्यांचे नाव पुढे करून भ्रष्टाचार केला आहे. मात्र या सर्वांमध्ये आरोग्य मंत्री बदनाम झाले असून वास्तविक पाहता त्यांच्यापर्यंत 30 टक्के रक्कम तरी पोहचली आहे का ? अशी चर्चा सार्वजनिक आरोग्य विभागात रंगली आहे, तर दुसरीकडे या सर्वच प्रकरणात बीडच्या भुमीपुत्रामुळे खुद्द आरोग्य मंत्री अडचणीत येणार असून यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील बडे नेते नजर ठेऊन आहेत. त्यामुळे भविष्यात “आरोग्य मंत्री” आणि “ईडी” असे समीकरण जुळणार असल्याचे आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी “सत्ताकारण”शी बोलताना सांगितले.
हे ही वाचा स्वयंघोषीत वसुलदारांच्या विरोधात विरोधातील डॉक्टर संजय राऊत, रोहीत पवार आणि ACB च्या दारी
आषाढी वारीत वारकऱ्यांना दर्जेदार आरोग्य सेवा द्या : सहसंचालक डॉ. राधाकिशन पवार
समावेशनाच्या नावाखाली वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून 45 ते 50 कोटींची वसुली