पुणे : प्रतिनिधी
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाला वेगळी दिशा दिली आहे. त्यांनी राज्यभरात “हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, राज्यभरात मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिरे, नवनविन हॉस्पिटलचे उद्घाटने करत आरोग्यसेवा बळकट करत आहेत. मात्र दुसरीकडे काही अधिकारी मात्र सार्वजनिक आरोग्य विभागाला काळीमा फासण्याचे काम करत आहेत. ज्यांच्या वारंवार लेखी तक्रारी सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक, प्रधान सचिव आणि आरोग्य मंत्री यांच्याकडे लेखी आणि तोंडी स्वरूपात केल्या जात आहेत. अशीच लेखी तक्रार इंटरनॅशनल ह्युमन राईट्स असोसिएशनचे उपाध्यक्ष शरथ शेट्टी यांनी NHM आयुक्त डॉ. धीरज कुमार यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे. यामध्ये संबंधीत अधिकारी-कर्मचाऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले असून “आरोग्य सहायक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाच्या पदोन्नतीसाठी दिड लाख रूपये रेटकार्ड” असल्याचे म्हटले आहे.
हे ही वाचा “नामदे”वाच्या पायरीवर खरेदीच्या फायली
NHM आयुक्त डॉ. धीरज कुमार यांच्याकडे इंटरनॅशनल ह्युमन राईट्स असोसिएशनचे उपाध्यक्ष शरथ शेट्टी यांनी दिलेल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे की, सार्वजनिक आरोग्य विभागाचे पुणे येथील सहसंचालक, मलेरिया पुणे कार्यालयामध्ये २५० कर्मचाऱ्यांची वरीष्ठ पदावर आरोग्य पर्यवेक्षक या पदावर पदोन्नती प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये सहसंचालक डॉ. राधाकिशन पवार हे या संपूर्ण प्रक्रियेचे रखवलदार आहेत. डॉ. राधाकिशन पवार यांनी राज्यभरातील सर्व सहायक संचालक पुणे, कोल्हापूर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, अकोला, नागपुर, लातूर या सर्व डॉक्टर मंडळींना त्यांच्या विभागातील आरोग्य पर्यवेक्षक या पदावर पात्र असलेल्या आरोग्य सहायक व प्रयोगशाळा तंत्रज्ञ या कर्मचाऱ्यांची यादी पाठविलेली आहे. हे सर्वजन पदोन्नतीसाठी पात्र आहेत. मात्र अशा या कर्मचाऱ्यांना सोयीनुसार पदोन्नती पाहिजे आहे. त्यासाठी सहायक संचालक यांना कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी दीड लाख रूपयांची ऑफर दिलेली आहे. त्यामध्ये २५ हजार त्या-त्या सहायक संचालक यांना ठेवून घेऊन प्रत्येकी सव्वा लाख रूपये डॉ. राधाकिशन पवार यांना पोहच केले जावे, अशा प्रकारचे आदेश व्हाट्सअप कॉलव्दारे सर्वांना देण्यात आले आहेत.
हे ही वाचा टक्केवारीनंतर आरोग्यातील अधिकाऱ्यांनी दिली सप्लायरला ऑर्डर
उपाध्यक्ष शेट्टी यांनी पुढे लेखी तक्रारीत म्हटले आहे की, यासाठी प्रथम पदोन्नतीसाठीची सर्व रिक्त पदे प्रसिध्द करण्यात यावीत. पदोन्नतीला पात्र कर्मचाऱ्यांची यादी प्रसिध्द करण्यात यावी. यामध्ये फार मोठया प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण होणार आहे. यासाठी खास श्री. विकास भुजबळ, श्री. महेश भागवत, श्री. सय्यद, आणि श्री. विजय पवार यांची खास नेमणुक केली आहे. तरी या पदोन्नतीची प्रक्रिया संपूर्णपणे पारदर्शक होण्यासाठी सर्व पात्र कर्मचाऱ्यांना बोलावून समुपदेशन घ्यावे. क्रमाक्रमाने जो सीनीयर आहे, त्याला त्याचे पद दयावे. यासाठी आयुक्त डॉ. धीरज कुमार यांनी जातीने लक्ष घालून जे कर्मचारी पैसे देऊ शकणार नाहीत, त्यांची पिळवणुक थांबवावी. तसेच या प्रकरणी डॉ. राधाकिशन पवार यांची निपक्षपणे व्हाट्सअप कॉल रेकॉर्डींगची चौकशी करावी. ज्यातून सर्व गोष्टी बाहेर येतील.
हे ही वाचा महिला व बाल रूग्णालयाचे उद्या आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते लोकार्पण
सदरची लेखी तक्रार सार्वजनिक आरोग्य विभागातील राज्यभरातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या व्हाट्सअपवर ग्रुपवर फिरत आहे. परिणामी आरोग्य मंत्री एकीकडे आरोग्य यंत्रणा रूळावर आणण्याचे काम करत असताना दुसरीकडे काही अधिकारी-कर्मचाऱ्यांमुळे आरोग्य विभाग मात्र नाहक बदनाम होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सदरच्या लेखी तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन आयुक्त डॉ. धीरज कुमार हे काय कारवाई करतील ? याकडे सार्वजनिक आरोग्य विभागाचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा फसवणूक प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनिष काळजेंवर गुन्हा दाखल