सोलापूर : प्रतिनिधी
शिवचैतन्य पारमार्थिक सेवा संघ संचलित श्री. परमेश्वर प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा नेहमीच वादग्रस्त आणि चर्चेचा विषय ठरली आहे. येथील बेकायदेशीर नेमणुका, बेकायदेशीर शिक्षकांना नाहक वेतन, इतर मागास बहुजन कल्याण विभागातीलच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्णयाच्या विरोधात वारंवार कोर्टात जाणे, शाळेतील अंतर्गत मुख्याध्यापक-शिक्षकांचा वाद, काही शिक्षकांकडून मुलांना शाळेत येऊन न शिकवता घरी बसून पगार घेणे, या पगारातील हिस्सा वरिष्ठांना देणे आदी अनेक प्रकार सुरू आहेत. त्यामुळे श्री. परमेश्वर आश्रम शाळेतील या सर्व प्रकारांना वरदहस्त कोणाचा ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र वस्तुस्थिती अशी आहे की, इतर मागास बहुजन कल्याण विभागातीलच वरिष्ठ अधिकारी हे कागदोपत्री शाळेतील शिक्षकांना अपात्र ठरवतात, मात्र कारवाई न करता त्यांना स्वतःच हे अधिकारी कोर्टाचा मार्ग दाखवतात. त्यामुळे या सर्व गैरप्रकाराला आणि शासनाचे दरवर्षी कोट्यावधींचे नुकसाण होण्यास याच विभागातील वरिष्ठ अधिकारी जबाबदार आहेत.
हे ही वाचा पालकमंत्री गोरेंच्या समोरच आमदार आवताडेंचा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवलेंवर टक्केवारीचा आरोप
शिवचैतन्य पारमार्थिक सेवा संघ संचलित श्री. परमेश्वर प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेतील सर्व गैरप्रकाराला “इतर मागास बहुजन कल्याण विभागातीलच वरिष्ठ अधिकारीच” जबाबदार आहेत. या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुटप्पी भुमिका घेतली नसती तर आज या शाळेतील 16 शिक्षक घरी बसले असते. परंतु अशा गैरप्रकारातूनच तर वरिष्ठांना मलिदा मिळत नाही का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या आश्रम शाळेतील 16 शिक्षकांना ज्या अधिकाऱ्याने बेकायदेशीर ठरवले होते, सध्या त्याच अधिकाऱ्यांकडून या आश्रमशाळेतील 16 शिक्षकांना वेतन अदा केले जात आहे. यावरून या विभागातील अधिकारीच अशा प्रकरणांमध्ये सामिल असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दरवर्षी एका आश्रम शाळेमध्ये 16 शिक्षकांवर कोट्यावधी रूपये वेतनाचा फटका शासनाला बसत आहे.
हे ही वाचा परमेश्वर आश्रम शाळेवरील प्रशासक आणि मुख्याध्यापकांच्या मनमानी कारभाराची चौकशी करून कारवाई करा
यासंदर्भातील या विभागाचे मंत्री अतुल सावे, प्रधान सचिव विनिता वैद सिंगल यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार दाखल झाली आहे. मात्र अद्यापही यावर कारवाई झाली नाही. या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, संदर्भीय पत्र क्र. 1 व 2 नुसार श्री. परमेश्वर प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा, कामती खुर्द ता. मोहोळ, जिल्हा सोलापूर या आश्रम शाळेतील 16 शिक्षकांची बेकायदेशीरपणे प्रशासकीय मान्यता व नियुक्त्या बनावट पत्रानुसार केल्या आहेत. तसा लेखी अहवाल श्रीमती मनिषा फुले यांनी संचालकांना देऊन कळवले आहे. तर दुसरीकडे वरील सर्व शिक्षकांची प्रशासकीय मान्यतेच्या प्रती कार्यालयातील अभिलेख कक्षात उपलब्ध नसल्याचे व तपासात दिसून येत नसल्याचे पत्र माहिती अधिकारातून तत्कालीन अपिलीय अधिकारी तथा सहायक आयुक्त समाजकल्याण सोलापूर नागेश चौगुले यांनी कळवले आहे. तसचे संदर्भ क्रमांक 1, 2 आणि 3 चे कागदोपत्री व सबळ पुराव्याचा अहवाल श्रीमती मनिषा फुले यांना ज्ञात असून देखील 16 शिक्षकांना दरमाह वेतन अदा केले जात आहे. यासंदर्भात श्रीमती फुले यांनी आपले जा.क्र.विजिसकअ-सो/आशा/कामती/08/09/132 विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी, सोलापूर यांचे कार्यालय, दि. 23/01/2009 नुसार दिलेला अहवाल. श्रीमती मनिषा फुले यांचे 28/03/2009 चे माननिय सचिव, सामाजिक न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे समोरिल अपिलातील प्रतिज्ञालेख आणि सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालय सोलापूर यांचे जा.क्र.सआसकसो/माअअ/कामती/2023-24/5157/सोलापूर दि.12/10/2023 रोजीचे माहिती अधिकारातील पत्र महत्त्वाचे आहे. त्यामुळे याला कोण जबाबदार आहे ? त्यांच्यावर याबाबत जबाबदारी निश्चीत करून कठोर कारवाई का होत नाही ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुसरीकडे या 16 शिक्षकांविरोधात अधिकाऱ्यांनी अहवाल देऊनही त्यांच्यावर कारवाई न करता त्यांना कोर्टात जाण्यास देखील याच विभागातील अधिकारी सांगत असल्याची चर्चा या विभागात सुरू आहे. त्यामुळे या गंभीर प्रकाराकडे खुद्द मंत्री अतुल सावे यांनी लक्ष देण्याची गरज आहे. तसेच एका शाळेत वर्षाला कोट्यावधींचे नुकसाण होत असेल तर, जिल्ह्यातील इतर शाळांमध्येही असेच प्रकार सुरू असून त्यामध्येही दरवर्षी कोट्यवधींचे नुकसाण होत असणार आहे, याकडेही मंत्री महोदय आणि सचिवांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
हे ही वाचा आरक्षण धोरणाची पायमल्ली करणाऱ्या डॉ. राधाकिशन पवार यांची चौकशी करून कारवाई करा
आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या कामकाजावर आरोग्यमंत्री आबिटकरांनी टाकला “प्रकाश”
आश्रमशाळेतील बेकायदेशीर नेमणुका ठरवलेल्या 16 शिक्षकांना वेतन सुरू