Virat Kohli | गायक शुबनीत सिंग ने खलिस्तानी वादग्रस्त चळवळीचे समर्थन केले आहे. यामुळे अनेक लोक त्याच्यावर नाराज असून, त्याला त्याचे शो रद्द करावे लागले आहेत. दुसरीकडे Virat Kohli ला सदरची बाब कळताच त्यानेही शुभनीत सिंग ला इंस्टाग्रामवर अनफॉलो केले आहे.
माजी क्रिकेट कर्णधार Virat Kohli ला पंजाबी संगीत आवडते आणि त्याने सांगितले की, भारतीय क्रिकेट संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये फक्त मी पंजाबी गाणी एकतो. यामध्ये तो शुबनीत सिंग याचा चाहता आहे. त्यामुळे कोहलीने त्याला फॉलो केले होते.
गायक शुबनीत सिंगने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये पंजाब, काश्मीर आणि ईशान्य भारतातील काही भाग गायब झालेला दाखवला आहे. तसेच या स्टोरीसोबत ‘प्रे फॉर पंजाब’ असे लिहिले आहे. या पोस्टमुळे खूप मतभेद झाले. यामुळे शुबनीतला मुंबईतील एक शो रद्द करावा लागला. सदरची गोष्ट विराट कोहलीला पसंत पडली नाही. त्यामुळे त्याने शुबनीत ला इंस्टाग्रामवर फॉलो करणे थांबवले आहे. खलिस्तान आंदोलक म्हणवणाऱ्यांना भारतापासून वेगळे व्हायचे आहे. Virat Kohli