Vikrant Massey | चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये गाजलेला अभिनेता विक्रांत मॅसी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. त्याची पत्नी शीतल ठाकूर हिला मूल होणार असून ते लवकरच आई-वडील होणार असल्याची अफवा पसरली होती. या जोडप्याने अधिकृतपणे या बातमीची पुष्टी केली नाही, म्हणून काही चाहत्यांनी ते खरे आहे की नाही याची खात्री नसल्याने विविध चर्चांना उत आला होता. परंतु आता खुद्द विक्रांतने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
Vikrant Massey ने पत्नी शीतल ठाकूरसोबतच्या लग्नाचा फोटो पोस्ट केला आणि एकत्र नवीन आयुष्य सुरू करण्याबद्दल लिहिले आहे. याबद्दल सोशल मीडियावर अनेकांनी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी पोस्टला लाईक आणि कमेंट केल्या आहेत.
View this post on Instagram
‘ब्रोकन बट ब्यूटीफुल’ या टीव्ही शोमध्ये काम करताना Vikrant Massey आणि शीतल ठाकूर यांची पहिली भेट झाली. 2015 पासून ते एकमेकांना डेट करू लागले. अखेर फेब्रुवारी 2022 मध्ये त्यांनी लग्न केले.
Vikrant Massey ने 12वी फेल, सेक्टर 36 आणि हसीन दिलरुबा 2 या दोन नवीन चित्रपटांमध्ये दिसणार आहे. शीतलने ‘अपस्टार्ट्स’, ‘ब्रिज मोहन अमर रहे’ आणि ‘छप्पर फाड के’ सारख्या अनेक चित्रपट आणि वेब शोमध्ये काम केले आहे.