Unauthorized Parking : बेगम पेठेतील अनेक इमारतींमधील पार्किंगच्या जागेत अनधिकृतरित्या उद्योग-व्यवसाय सुरू (Unauthorized industries and businesses start in the parking space) असल्याची लेखी तक्रार शिवसेना अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष मुस्ताक महिबूब शेख यांनी केली होती. यासंबंधीचे वृत्त अनेक माध्यमांमध्ये प्रसिध्द झाले होते. परिणामी सदरच्या तक्रारीच्या अनुषंगाने बांधकाम विभागाच्या प्रमुख सारिका अकुलवार यांनी येथील वस्तुस्थितीची पाहणी करण्यासाठी अधिकारी पाठवले. त्यानंतर येथील वस्तुस्थितीची पाहणी करून सदरचा अहवाल बनवला असून तो अहवाल पुढील कारवाईसाठी प्रशासक तथा आयुक्त शितल तेली-उगले यांच्यासमोर ठेवला असल्याची माहिती बाधकाम विभाग प्रमुख सारिका अकुलवार यांनी दिली.
बेगम पेठेतील इनेक इमारतींच्या पार्किंगमध्ये अनधिकतरित्या उद्योग-व्यवसाय सुरू असल्याची तक्रार शिवसेना अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष मुस्ताक महिबूब शेख यांनी दिली होती. त्यानुसार बेगम पेठ (Begum Peth) येथे बांधकाम परवाना नुसार बांधकाम केलेले नाही, परवानगी घेताना महापालिकेच्या नियमानुसार तळमजला पार्किंगसाठी सोडण्यात आला, परंतु सध्या प्रत्यक्षात तेथे अनेक शॉप (गाळे) बांधून भाड्याने देण्यात आले आहेत. याला रफिक मस्तुमसाब खरादी, रियाज महम्मद पटेल, अफसर शेख, कुरेशी, पिरजादे आदी जबाबदार आहेत. या सर्वांनी व इतरांनी पार्किंगच्या जागेत अनधिकृतरित्या उद्योग-व्यवसाय सुरू केले आहेत. त्यांनी महापालिकेची फसवणूक केली आहे. शासनाच्या टॅक्सची चोरी केली आहे. काही ठिकाणी दोन मजल्यांचा परवाना घेऊन प्रत्यक्षात 5 मजली बांधकाम केले आहे. अतिरिक्त FSI वापरून बांधकाम करण्यात आले आहे, महापालिकेच्या नियमानुसार सेट बॅक मार्जिन सोडलेली नाही, संबंधीत अनेक इमारतींचा वापर परवाना न घेता इमारत वापरात आणली आहे. अशा पध्दतीने गैरप्रकार करत पार्किंगच्या जागी शॉप/गाळे (Unauthorized Parking) सुरू असल्याने तेथे येणाऱ्या ग्राहकांना, तेथून ये-जा करणाऱ्या नागरिकांना, प्रवाशांना नाहक ट्राफिकचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच येथील रहिवासी जनतेलाही दररोज त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तरी महापालिका प्रशासनाने येथील बेकायदेशीर पार्किंगमधील शॉपवर कायदेशीर कारवाई करून पाडकाम करावे, शॉप/गाळे धारकांकडून 2001 पासून कमर्शिअल टॅक्स आणि दंड वसुल करावा, अन्यथा महापालिका प्रशासनाच्या विरोधात मंत्रालयात नगरविकास मंत्र्यांच्या दालनात उपोषणाला बसणार असल्याचे तक्रारदार जिल्हाध्यक्ष मुस्ताक महिबूब शेख यांनी सांगितले.
– प्रशासक तथा आयुक्त शितल तेली-उगले यांनी सोलापूरात रूजू झाल्याच्या पहिल्या दिवसांपासून कामाचा धडाका सुरू ठेवला आहे. त्यांनी महापालिकेत रूजू होताच पहिल्याच दिवशी बाळे येथील संतोष नगरमध्ये स्वतः जावून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या अण सोडवल्या देखील. त्यानंतर अनधिकृत होर्डिंग्ज, अनधिकृत अतिक्रमण हटवण्याची मोहिम सुरू आहे, गेल्या अनेक वर्षांपासूनचा लक्ष्मी नगर आणि सोरेगाव येथील पाणीप्रश्न आणि रस्त्याचा प्रश्न सोडवला. परिणामी येथील महिलांनी आयुक्तांचा सत्कार केला. दुहेरी जलवाहिनी कामाला गती दिली, शहराचे प्रवेशव्दार असलेले छत्रपती संभाजी महाराज चौक येथील रस्ता आणि सुशोभिकरणाचा प्रश्न मार्गी लावला आहे. त्यामुळे अशा धडाकेबाज व कामाला प्राधान्य आणि गैरकृत्याला आळा घालणाऱ्या आयुक्त शीतल तेली-उगले या बेगम पेठेतील इमारतींच्या पार्किंगमध्ये अनधिकृत्यारित्या सुरू केलेले उदयोग-व्यवसायांवर कारवाई नक्की करणार असल्याची चर्चा बेगम पेठ व शहरातील नागरिकांमधून केली जात आहे.