Medical Officer : सोलापूर महापालिकेतील मुख्य वैद्यकीय अधिकारी (MOH) हे पद गेल्या 2 महिन्यांपासून रिक्त आहे. परिणामी सार्वजनिक आरोग्य विभागातील अनेक वैद्यकीय अधिकारी येथे येण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ज्यामध्ये सातार्यातील एक महिला अधिकारी पती-पत्नी एकत्रीकरणाच्या नावाखाली सोलापूर महापालिकेत येण्यास इच्छुक आहे. मात्र या पदासाठीची अर्हता त्यांच्याकडे नसताना त्यांच्याकडून पुण्यातील एका वरिष्ठ अधिकार्यांना हाताशी धरून बदलीसाठीचे प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये पुण्यातील वरिष्ठ अधिकार्यांकडूनही सावंत बंधूंची दिशाभूल करून संबंधीत महिला अधिकार्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
हे ही वाचा तलाठी पेपर फुटी संदर्भात पुरावे देऊनही निवड यादी जाहीर
सोलापूर महापालिकेतील मुख्य वैद्यकीय अधिकारी हे पद गेल्या दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधीत झाला तरी रिक्त आहे. मात्र अद्यापही ते भरण्यात आलेले नाही. मुख्य वैद्यकीय अधिकारी या पदासाठी सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील पदवी अथवा पदविका धारक म्हणजेच MBBS, DPH अथवा MBBS MD CPSM असणे आवश्यक आहे. या तज्ञांच्या मार्फत माता बालसंगोपनातील सर्व कार्यक्रम राबवणे, साथ रोग नियंत्रण उपाय करणे, लसीकरण करणे, सर्वसामान्य जनतेचे आरोग्य सुधारणे, आरोग्याचा दर्जा सुधारणे आदी गोष्टी कराव्या लागतात. परंतु या सर्व गोष्टींना डावलून अर्हता नसणार्यांसाठी का प्रयत्न सुरू आहेत ? आपल्या मर्जीतील वैद्यकीय अधिकाऱ्यांना पदस्थापना देण्याचा घाट सार्वजनिक आरोग्य विभागात का घातला जात आहे ? तसेच संबंधित वैद्यकीय अधिकारी या कान, नाक, घसा तज्ञ म्हणजेच ENT स्पेशलिस्ट आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागात तज्ञ डॉक्टरांची आधीच कमतरता असताना त्यांच्याकडून गोरगरीब जनतेला क्लिनिकल वैद्यकीय सेवा देण्याचे सोडून केवळ आर्थिक जोरावर महानगरपालिकेत मुख्य वैद्यकीय अधिकारी पदावर बसविण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. मात्र यामध्ये अर्हता नसल्याची बाब आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यापासून लपवून ठेवली जात आहे. आरोग्य मंत्र्यांना अंधारात ठेऊन अशा प्रकारे नियुक्ती देण्याचे काम सुरू आहे. तरी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सोलापूर महानगरपालिकेत सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ञ व अनुभवी व्यक्ती मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमावा, जेणेकरून सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेला आणखी उर्जितावस्था प्राप्त होईल व सर्वसामान्य गोरगरीब जनतेला चांगली व दर्जेदार आरोग्य सुविधा मिळेल.
हे ही वाचा सर्फराजच्या टीम इंडियातील एन्ट्रीवर पाकिस्तानी खेळाडूकडून शुभेच्छा
भाजपच्या चंद्रकांत पाटलांची वारी, काँग्रेसमधील सुशिलकुमार शिंदेंच्या घरी
App Uninstall करूनही Leak होईल तुमचा Data, Phone मध्ये लगेच करा ही Settings