Daily Rashi Bhavishya In Marathi : आज आपण जानून घेऊया आपले आजचे राशीभविष्य (Today Horoscope In Marathi 29 Oct 2023). ज्यामधून समजेल आपला दिवस कसा जाईल ? आर्थिक स्थिती कशी राहिल ? काय लाभ होईल ? काय प्रगती होईल आणि काय टाळल्यावर दिवस सुखी जाईल…
मेष : या राशींच्या लोकांसाठी आज कौटुंबिक जीवन सुखी असणार. आर्थिक दृष्ट्या आजचा दिवस समाधानाचा आहे. आज दिवस कामाचा ध्यास घेणाऱ्यांसाठी दिवस चांगला आहे. विद्यार्थ्यांच्या कष्टाचे आज चीज होणार आहे.
—————————————————————
वृषभ : या राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस समाधानाचा असेल. आज छोटेमोठे मतभेद टाळा. आजचा दिवस व्यावसायिकदृष्ट्या चांगला असेल. आज गुंतवणुकीची एक चांगली संधी मिळेल.
—————————————————————
मिथुन : व्यवसायासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. व्यवसायात तेजी दिसून येईल. आर्थिक दृष्ट्या आजचा दिवस चांगला असणार. आज उत्पन्नाची साधने वाढवण्याच्या संधी मिळतील. जोडीदाराच्या आरोग्याकडे आज लक्ष द्यावे.
—————————————————————
कर्क : या राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस संमीश्र असणार. आज अडचणींना सामोरे जावे लागणार. आज मानसिक संतुलन बिघडवू देऊ नये. शांत राहून आज कामे पूर्ण करावी. कुटुंबियांमध्ये वाद निर्माण होण्याचे आज संकेत आहेत.
—————————————————————
सिंह : या राशींच्या लोकांनी आज आपले आरोग्य सांभाळावे. नोकरीत बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वरिष्ठांबरोबरचे आज होणारे वाद टाळा. आज तुम्हाला सुख व शांती मिळेल. आज खर्चामध्ये वाढ होईल.
—————————————————————
कन्या : या राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे. आज उत्पन्नाची साधने वाढण्यास मदत होईल. आज नातेवाईकांचा आधार मिळेल. आज व्यवसायात वाढ दिसून येईल. आरोग्याच्या समस्या आज जाणवतील.
—————————————————————
तुळ : तूळ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. आज सुखी राहाल. आज जीभेवर ताबा ठेवणे शहाणपणाचे ठरणार. अनावश्यक खर्च टाळावा. व्यवसायात वाढ दिसेल. आज गुंतवणूक विचारपूर्वक करावी. नवीन संधी येण्याची शक्यता.
—————————————————————
वृश्चिक : आज वृश्चिक राशींच्या लोकांच्या घरात संतुलित वातावरण असणे चांगले ठरेल. आज अनावश्यक चर्चा टाळाव्यात. व्यावसायिक पातळीवर अडचणींना तोंड द्यावे लागणार. स्वास्थ्य विषयक चिंता मिटतील. घरातील मोठ्यांचा सल्ला आज घेणे फायद्याचे ठरेल.
—————————————————————
धनु : आज यश प्राप्तीसाठी मोठ्या प्रमाणात परिश्रम घ्यावे लागतील. अनावश्यक प्रवास टाळणे योग्य राहिल. व्यवसायात उधारी देणे टाळावे. मनात नकारात्मक भावना आल्यास आज महत्वाचे निर्णय शक्यतो घेऊ नका.
—————————————————————
मकर : आज आर्थिक बाबींकडे लक्ष द्यावे लागेल. गुंतवणूक करताना सर्व गोष्टींचा विचार करा. कुटुंबीयांसोबत काही मतभेद असतील तर ते मिटवता येतील. गैरसमज मिटवण्याचा प्रयत्न करता येईल.
—————————————————————
कुंभ : कुंभ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक आहे. मनातील ऊर्जा नोकरीच्या ठिकाणी फलदायी ठरणार. आज आध्यात्मिक प्रवास घडेल. आज आरोग्य साथ देणार. आज वाहन चालवताना सावधगिरी बाळगावी.
—————————————————————
मीन : विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. काहीजण आज तुमच्या विरुद्ध जातील. आज कर्जांवरून वाद होऊ शकतात. आज मोठी गुंतवणूक करणे टाळलेली बरी. नकारात्मक प्रभाव टाळण्यासाठी आज सायंकाळी मंदिरात देव दर्शनासाठी जावे.
हे ही वाचा Lemon Tea प्या आणि निरोगी रहा; पहा Lemon Tea चे 5 आरोग्यदायी फायदे
तुम्हाला Dark Chocolate आवडते ? जाणून घ्या Chocolate खाण्याचे फायदे…