Daily Rashi Bhavishya In Marathi : आज आपण जानून घेऊया आपले आजचे राशीभविष्य (Today Horoscope In Marathi 11 Oct 2023). ज्यामधून समजेल आपला दिवस कसा जाईल ? आर्थिक स्थिती कशी राहिल ? काय लाभ होईल ? काय प्रगती होईल आणि काय टाळल्यावर दिवस सुखी जाईल…
मेष : या राशींच्या व्यक्तींच्या घरगुती जीवनात ताण-तणाव येईल. व्यवसायिकांनी मोठी गुंतवणूक करू नये. अनावश्यक खर्च नियंत्रणात ठेवावा. अनावश्यक वादांकडे दुर्लक्ष करावे. आज कामाच्या ठिकाणी दक्ष रहावे.
शुभ अंक- 3
शुभ रंग- निळा
—————————————————————
वृषभ : या राशींच्या लोकांचा आजचा दिवस सकारात्मक राहील. नोकरवर्गाला थोड्याफार समस्या भेडसावतील. व्यवसायिकांना नफा होण्याची शक्यता. बेकायदेशीर प्रकरणांपासून दूर रहावे. आज गृहसौख्य लाभेल. आई-वडिलांच्या आरोग्याची नेहमीप्रमाणे काळजी घ्यावी.
शुभ अंक- 2
शुभ रंग- लाल
—————————————————————
मिथुन : आज प्रकृतीची काळजी घ्यावी. खर्च नियंत्रणात ठेवावा. आज कर्ज घेणे टाळा. व्यवसायिकांना आजचा दिवस लाभदायक ठरणारा आहे. जोडीदाराचा सल्ला घेणे आज फायद्याचे ठरेल.
शुभ अंक- 4
शुभ रंग- पांढरा
—————————————————————
कर्क : या राशींच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस चांगला आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत घनिष्टता चांगली राहील. तब्येतीबद्दल काळजी घेणे आवश्यक आहे. आर्थिक व्यवहारांमध्ये त्वरित समोरच्यावर विश्वास ठेऊ नये. आज कार्यालयात कामाचा भार वाढेल.
शुभ अंक- 8
शुभ रंग- हिरवा
—————————————————————
सिंह : या राशींच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस उत्तम असेल. जोडीदारासोबत नाते उत्तम राहणार. आर्थिक बाबी मार्गी लागण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीचा विचार करा. मात्र मोठे खर्च करणे टाळा. स्वतःला अध्यात्मामध्ये गुंतवून ठेवा. आजज दुरचा प्रवास टाळा.
शुभ अंक- 6
शुभ रंग- केशरी
—————————————————————
कन्या : या राशींच्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल नाही. अनेक बाबतीत काळजी घ्यावी लागणार. आज कुटुंबातील सदस्यांसोबत भांडण होण्याची शक्यता. आरोग्य बिघडण्याचे संकेत. आर्थिक बाबतीत हात आखडता घ्यावा. व्यवसायात तेजी दिसून येईल.
शुभ अंक- 5
शुभ रंग- गुलाबी
—————————————————————
तुळ : आज कुटुंबात एकोपा राहणार असल्याने महत्वाचे कौटुंबिक निर्णय घेऊ शकाल. नोकरीतील लोकांचे आयुष्य उत्तम आहे. अनपेक्षित खर्च होऊ टाळा. पैसे उसने देताना दक्ष राहा. जोडीदारासोबत आज समजूतदारपणा दाखवा.
शुभ अंक- 3
शुभ रंग- जांभळा
—————————————————————
वृश्चिक : आज या राशींच्या लोकांना प्रत्येक बाबतीत आपल्या जोडीदाराशी जुळवून घेण्याची गरज आहे. वैयक्तिक जीवनात चढ-उतार येणार. मुलांच्या वर्तनामुळे मानसिक ताण येईल. आळसावर नियंत्रण ठेवा. आज प्रयत्नांवर नकारात्मक परिणाम होऊ देऊ नका.
शुभ अंक- 7
शुभ रंग- पोपटी
—————————————————————
धनु : आज कुटुंबातील व्यक्तींबरोबर तंटा उत्पन्न होण्याची शक्यता. त्यामुळे जिभेवर नियंत्रण ठेवा. नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस सकारात्मक आहे. आर्थिक बाबी मार्गी लागणार. परंतु फसवणूकपासून स्वतःचे रक्षण करा. व्यवसायिकांनी आजच्या निर्णयांबद्दल खबरदारी घ्यावी. बेकायदेशीर प्रकरणांपासून दूर राहावे.
शुभ अंक- 2
शुभ रंग- हिरवा
—————————————————————
मकर : आज वैयक्तिक जीवनात समाधान मिळेल. अपचन किंवा डोकेदुखीचा त्रास उद्भवण्याची शक्यता आहे. आर्थिक आघाडीवर फायद होण्याची शक्यता आहे. नोकरीमार्फत मोठ्या संधी चालून येतील. मात्र कष्टाची तयारी ठेवा. आज नोकरणीच्या ठिकाणी प्रतिष्ठा व आदर मिळेल. आज नवीन आणि अधिक चांगली नोकरी मिळेल. कर्ज किंवा उसने घेणे टाळा.
शुभ अंक- 4
शुभ रंग- निळा
—————————————————————
कुंभ : या राशींच्या लोकांना आज किरकोळ समस्या उद्भवतील. मात्र परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही याची काळजी घ्या. आर्थिक जीवन सौख्याचे राहणार आहे. जवळच्या मित्रांचा सल्ला फायद्याचा ठरणार. नोकरीत नाव, प्रतिष्ठा मिळेल. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नये. आई-वडिलांसोबत बोलताना काळजी घ्यावी.
शुभ अंक- 6
शुभ रंग- लाल
—————————————————————
मीन : या राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. कौटुंबिक स्थिती फारशी आशादायक असेल असे नाही. काळजीपूर्वक वर्तन आणि हुशारीने कृती करा. तुमच्या मार्गीतल समस्या दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करा. आज कोणतीही चूक करू नये, पुढे ती चुक नुकसानदायक ठरू शकते. प्रकृतीची काळजी घ्यावी. भागीदारीत कोणतेही काम सुरु करू नये.
शुभ अंक- 2
शुभ रंग- पांढरा
Today Horoscope In Marathi 10 Oct 2023 | आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2023