सोलापूर : प्रतिनिधी
“सोलापूर ॲन्टी करप्शन”मधील अधिकाऱ्यांकडून जिवितास धोका आहे, अशी तक्रार खुद्द मु. पो. कोर्टी, ता. पंढरपूर जि. सोलापूर येथील समाजसेवकाने पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, राज्य कार्यालय, मुंबई यांच्याकडे लेखी स्वरूपात दिली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा सोलापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कंत्राटी भरती प्रक्रियेमध्ये घोळ
तक्रारदाराने पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंध विभाग, राज्य कार्यालय, मुंबई यांच्याकडे दिलेल्या तक्रारी अर्जामध्ये म्हटले आहे की, मी एक समाजसेवक असून सामान्य नागरीकांना मदत करीत असतो. मी अॅन्टी करप्शन सोलापूर येथे भ्रष्टाचारी प्रवृत्ती असलेले व त्यांचा पुर्व इतिहास देखिल मलिन असलेले पोलीस कर्मचारी नेमण्यात आले असलेबाबतचा अर्ज मा. पोलीस महासंचालक, अॅन्टी करप्शन मुंबई यांचेकडे दिलेला होता. मी दिलेल्या अर्जावर अॅन्टी करप्शन ब्युरो पुणे येथे मा. शितल जानवे/खराडे, अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंध, पुणे यांचेकडे चौकशीसाठी दिला होता. त्यांनी मला चौकशीकरीता उपस्थित राहण्याबाबत पत्र पाठविले आहे. त्यावेळी मी दिंडीमध्ये असल्याने आषाढी वारीमुळे बसेस सुरळीत नसल्याकारनाने चौकशीकरीता उपस्थित राहण्यासाठी मुदत मागितली होती. यावेळी त्यांनी पुन्हा मला चौकशी कामी उपस्थित रहावे, अन्यथा मी दिलेला तक्रारी अर्ज दप्तरी दाखल करण्यात येईल, असे कळविले होते. अशा प्रकारे चौकशी एकतर्फी बंद करण्यात येऊन अर्ज दप्तरी दाखल करण्याबाबत कळविण्यात आलेनंतर मी समक्ष उपस्थित राहुन जे म्हणणे देणार होतो, ते पत्राव्दारे कळविले असुन तोच माझा जबाब समजुन गैरअर्जदार सोनवणे व घाडगे यांचे वर कारवाई करावी, असे कळविले होते. तसेच दोन्ही कर्मचारी यांचेविरध्द पुरावे कशा प्रकारे गोळा होतील, याबाबत माहिती दिली होती. परंतु दोन वेळा चौकशीकामी उपस्थित राहणेबाबत पत्रे देऊन लगेचच अर्ज दप्तरी दाखल करण्याबाबत कळविल्याने वरील दोन कर्मचारी यांना पाठीशी घालण्यात येत असल्याबाबत संशय निर्माण होत आहे.
हे ही वाचा जिल्हा आरोग्य अधिकारी पदी डॉ. अनिरूध्द पिंपळे यांची कोल्हापुरला नियुक्ती
काही दिवसांपुर्वी मला स्थानिक राजकारणातील पुढारी तसेच काही पोलीसांकडून फोन आला की, अर्ज माघारी घ्या. वरील दोन कर्मचारी ही भेटण्याकरीता आलेले असे सांगितले गेले आहे. तरी माझे म्हणणे असे आहे की, मी दिलेला अर्ज हा पोलीस महासंचालक कार्यालयास दिल्यानंतर त्याबाबत कोणासही काही एक समजले नव्हते. परंतु चौकशी पुणे येथे कार्यालयामध्ये नेमल्यानंतर वरील दोन्ही कर्मचारी यांना तक्रारी अर्ज आल्याचे समजलेच कसे काय ? या वरून असे वाटते की, यापुर्वी पासुन सोलापूर अॅन्टी करप्शन कार्यालयाबाबत होत असलेल्या गोपनिय बाबी लिक होत असल्याची खात्री वाटत असुन पुणे येथील कार्यालयाकडुन त्यांना समजलेच कसे काय ? याबाबत चौकशी होणे आवश्यक असुन वरील दोन कर्मचारी सोनवणे व घाडगे हे भ्रष्टाचारी प्रवृतीचे असतांना त्यांना नेमणुक कशावरून दिली गेली ? हा देखिल मोठा संशयास्पद आहे. सोनवणे व घाडगे हे स्थानिक पोलीसांच्या मदतीने माझेवर दबाव टाकत असुन त्यांचेवर असलेले आरोप हे खरे असल्याने त्यांनी त्यावर पडदा टाकावा, याकरीता मला दबाव आणत आहेत. तरी त्यांच्यापासुन माझ्या जिवितास धोका असल्याचे मला वाटत आहे. हे दोन पोलीस मोठ्या प्रमाणावर शासकिय अधिकारी व सेवकांना धारेवर धरुन पैसे उकळत असल्याची बरेच प्रकरणे ऐकण्यास मिळाली असुन त्यांच्यावर तातडीने कारवाई अपेक्षित आहे. या दोन कर्मचाऱ्यांना त्यांच्याच कार्याल्यातील अधिकारी हे पाठीशी घालत असुन त्या अधिकारी यांची चांगली सुश्रुशा करीत असल्याने अधिकारी हे त्यांना पाठीशी आहेत. तरी संघटनेच्यावतीने लवकरच लोकप्रतिनिधी आमदार श्री. धंगेकर साहेब यांची भेट घेवुन पुणे येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जसे वसुलीचे रॅकेट उघड केलेले होते, तसे रॅकेट सोलापूर अॅन्टी करप्शनचे लवकरच उघड करणार आहोत. त्यामध्ये सोनवणे व घाडगे हे कशा प्रकारे खाजगी वसुली करणारे इसमांकडुन कसे व किती वसुली करतात, याबाबत आकडेवारी लवकरच आपणास देवु, असेही तक्रारी अर्जात तक्रारदाराने म्हटले आहे.
हे ही वाचा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक पदी पुन्हा डॉ. स्वप्निल लाळे
पुढे तक्रारी अर्जात म्हटले आहे की, मी याआधी चौकशीकरीता दिलेल्या पत्रामध्ये बरेच पुरावे कसे भेटतील याबाबत माहिती दिलेली असुन त्यावरून सोनवणे व घाडगे यांचेवर कारवाई होईल, ही अपेक्षा आहे. त्यांना चौकशी नेमली असल्याबाबत माहिती मिळालीच कशी काय ? याबाबत देखिल चौकशी व्हावी व पुणे येथील कार्यालय हे सोलापूर येथील भ्रष्टाचारी प्रवृत्तीला पाठीशी घालत आहे काय ? याबाबत शंका येत असुन त्याबाबत देखिल चौकशी व्हावी, ही विनंती. तरी भविष्यात मला मी दिलेल्या अर्जामुळे सोनवणे व घाडगे तसेच सोलापूर येथील अधिकारी श्री. कुंभार यांच्याकडुन जिवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्यांचे अर्ज माघारी घेण्याबाबत मला होत असलेले प्रयत्न लक्षात घेता भविष्यात माझ्या जिवितास काही बरे-वाईट झाल्यास वरील लोकांना जबाबदार धरण्यात यावे, ही विनंती, असे तक्रारदाराने लेखी तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारी अर्जामुळे राज्यातील सर्वच लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्येही हा विषय चर्चिला जात आहे. त्यामुळे या गंभीर प्रकाराकडे पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, राज्य कार्यालय, मुंबई यांच्याकडून काय कारवाई होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा 297 कोटींच्या औषध घोटाळ्यातील निलंबीत डॉ. राधाकिशन पवारांवर महत्त्वांच्या पदांची बरसात
आरोग्य मंत्र्यांना CM करायचं आहे, आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी प्रत्येकी लाख रूपये पाठवा