मुंबई : प्रतिनिधी
नुकत्याच विधानसभा निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांना भरघोस यश मिळाले. मात्र सत्तास्थापन, खातेवाटपावरून गोंधळ सुरू होता. अखेर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी (दि. 21 डिसेंबर 2024) सायंकाळी खातेवाटप करण्यात आले आहे.
यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महत्त्वाचे असे गृह खाते याचबरोबर ऊर्जा आणि कायदा व न्याय हे खाते तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास आणि गृहनिर्माण खाते देण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त आणि नियोजन खाते देण्यात आले. तसेच चंद्रशेखर बावनकुळे : महसूल, राधाकृष्ण विखे पाटील : जलसंधारण ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास), हसन मुश्रीफ : वैद्यकीय शिक्षण, चंद्रकांत पाटील : उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री, गिरीश महाजन : जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन, गुलाबराव पाटील : पाणीपुरवठा, गणेश नाईक : वन, दादा भुसे : शालेय शिक्षण, संजय राठोड : माती व पाणी परीक्षण, धनंजय मुंडे : अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, मंगलप्रभात लोढा : कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन, उदय सामंत : उद्योग व मराठी भाषा, जयकुमार रावल : विपणन, प्रोटोकॉल,पंकजा मुंडे : पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन, अतुल सावे : ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नुतनीकरण, अशोक उईके : आदिवासी विकास मंत्रालय, शंभूराज देसाई : पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय, आशिष शेलार : माहिती व तंत्रज्ञान, दत्तात्रय भरणे : क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, अदिती तटकरे : महिला व बालविकास, शिवेंद्रराजे भोसले : सार्वजनिक बांधकाम, माणिकराव कोकाटे : कृषी, जयकुमार गोरे : ग्रामविकास, पंचायत राज, नरहरी झिरवाळ : अन्न व औषध प्रशासन, संजय सावकारे : कापड, संजय शिरसाट : सामाजिक न्याय, प्रताप सरनाईक : वाहतूक, भरत गोगावले : रोजगार हमी, फलोत्पादन, मकरंद पाटील : मदत व पुनर्वसन, नितेश राणे : मत्स्य आणि बंदरे, आकाश फुंडकर : कामगार, बाबासाहेब पाटील : सहकार, प्रकाश आबिटकर सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री.
राज्यमंत्री : माधुरी मिसाळ : सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण, आशिष जयस्वाल : अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय, मेघना बोर्डीकर : सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा, इंद्रनील नाईक : उच्च आणि तंत्र शिक्षण, आदिवासी विकास आणि पर्यटन, योगेश कदम : गृहराज्य शहर, पंकज भोयर : गृहनिर्माण.
हे ही वाचा कार्यकारी अभियंता कोंडेकर यांच्याकडून शासन निर्णयास डावलून मनमानी पध्दतीने अनेक टेंडरचे वाटप
आश्रमशाळेतील बेकायदेशीर नेमणुका ठरवलेल्या 16 शिक्षकांना वेतन सुरू