मोहोळ : प्रतिनिधी
Sugarcane Workers Diwali : मोहोळ तालुक्यातील परमेश्वर पिंपरी येथील तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष तथा सोलापूर महापालिका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष रामभाऊ दुधाळ यांनी ऊसतोड कामगारांची दिवाळी गोड केली.
हे ही वाचा दिवाळीत सोलापूर महापालिकेत 226 पद भरतीचा धमाका
सोलापूर महापालिका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या माध्यमातून अध्यक्ष दुधाळ नेहमीच सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करत असतात. यापूर्वी त्यांनी एचआयव्ही बाधितांना कपडे, पौष्टीक आहार व शालेय साहित्याचे वाटप, महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च, पावसाळ्यात गरजूंना छत्र्या व रेनकोट वापट आदी समाजोपक्रम राबविले आहेत. याचप्रमाणे यंदाही त्यांनी दिवाळीनिमित्त सामाजिक बांधिलकी जपत त्यांच्या शेतातील ऊसतोड कामगारांची दिवाळी (Sugarcane Workers Diwali) फराळ वाटून गोड केली. त्यांनी त्यांच्या शेतातील तीन ऊसतोडणी टोळीतील 75 ऊसतोड मजुरांना प्रत्येकी उबदार ब्लँकेट, फराळ पाकीटे आणि महिलांना साडी वाटप करून दिवाळीचा आनंद द्विगुणित केला आहे. दिवाळीची भेट मिळाल्याने शेतात ऊसतोडणी करणाऱ्या गरजू-गरीब कामगार, महिला व मुलांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पहायला मिळाला.
यावेळी बोलताना अध्यक्ष दुधाळ म्हणाले, आपण सर्वजन समाजाचे देणे लागतो. आजही समाजातील काही घटनक मुलभूत सेवा-सुविधांपासून वंचीत आहे. त्यांच्यासाठी आपण आपल्यापरिने सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. प्रत्येकाने समाजभान राखून समाजकार्य केले पाहिजे. जेणेकरून आपल्याच समाजातील वंचीत बांधव आपल्या सहकार्याने आनंदीत होतील.
याप्रसंगी जयप्रकाश मदने, मलका दुधाळ, अण्णा बंडगर, दिगंबर पुजारी, शहाजी सलगर, बाबुराव पाटील, शिवाजी बंडगर, गणेश बंडगर, नारायण दुधाळ, अभिषेक संती, कुणाल दुधाळ, बाळासाहेब दुधाळ आदी उपस्थित होते.
हे ही वाचा दिवाळीत अन्न पदार्थांमध्ये भेसळ; स्विट मार्ट, बेकरी व हॉटेलवर कारवाई
एम. के. फाऊंडेशनने एक हजार कुटूंबांची दिवाळी केली गोड