सोलापूर : प्रतिनिधी
बदलापूर येथे शाळेमध्ये घडलेली घटना देशासाठी अतिशय निंदनीय आणि लाजिरवाणी आहे. आम्ही या गोष्टचा तीव्र निषेध करतो आणि बदलापूर येथील शैक्षणिक संस्था ही भाजपच्या व RSS च्या संबंधित व्यक्तीची आहे. तसेच सरकारी वकील उज्ज्वल निकम हे लोकसभेला भाजपचे उमेदवार होते. सदरील संस्था चालक व संबंधित व्यक्ती यांचे उज्ज्वल निकम यांच्याशी जवळचे संबंध आहेत. त्यामुळे या प्रकरणात पक्षपातीपणा होण्याची शक्यता आहे, असे झाले तर पिडीत मुलीला आणि पिडीत कुटुंबाला योग्य तो न्याय मिळणार नाही. त्यामुळे बदलापूर प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून सोलापूरचे सरकारी वकील प्रदिपसिंग राजपूत यांची नियुक्ती करावी, अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्याध्यक्ष गणेश मोरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
हे ही वाचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या दक्षिण तालुका कार्याध्यक्षपदी गणेश मोरे
गणेश मोरे यांनी गृहमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सतत वादग्रस्त ठरलेले ॲड. उज्ज्वल निकम यांच्याऐवजी या प्रकरणात सोलापूरचे अनुभवी व निष्पक्षपणे काम करणारे सरकारी वकील प्रदिपसिंग राजपूत यांची तातडीने नियुक्त करावी. तसे योग्य ते आदेश व्हावेत, अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्याध्यक्ष गणेश मोरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मेलद्वारे केली आहे.
हे ही वाचा वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा काळेंवर कारवाई करत पदव्युत्तर पदविका वेतनवाढी रद्द आणि वसुल करा
Dismiss | डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांना बडतर्फ करा – आरोग्य मंत्र्यांकडे छावा संघटनेची मागणी