दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री Rashmika Mandanna बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरसोबत ‘Animal’ या चित्रपटात दिसणार आहे. तिचा ‘Animal’ चित्रपटातील फर्स्ट लूक समोर आला आहे. या चित्रपटाबद्दल तिचे चाहते खूप उत्सुक आहेत.
सोशल मिडीयावर एक व्हिडिओ खूप लोकप्रिय झाला होता. व्हिडिओमध्ये अभिनेत्री Rashmika Mandanna ही Ranbir Kapoor सोबत काम करताना दिसत आहे. यामुळे चाहत्यांना उत्सुकता होती की या दोघांचा नेमका कोणता चित्रपट येणार आहे. परंतु सध्या तिचा ‘Animal’ चित्रपटातील लूक प्रदर्शित झाल्याने चाहत्यांचा याची कल्पना आली आहे. परंतु या पोस्टरमधून Rashmika Mandanna ला पहिल्यांदाच दाखवण्यात आले आहे.
Your Geetanjali. ❤️#Animal #AnimalTeaserOn28thSept#AnimalTheFilm #AnimalOn1stDec@AnimalTheFilm @AnilKapoor #RanbirKapoor @thedeol @tripti_dimri23 @imvangasandeep #BhushanKumar @VangaPranay @MuradKhetani #KrishanKumar @anilandbhanu @VangaPictures @Cine1Studios @TSeries… pic.twitter.com/AGhexxDIHn
— Rashmika Mandanna (@iamRashmika) September 23, 2023
अभिनेत्री Rashmika Mandanna ही ‘Animal’ सिनेमात कशी दिसणार याचे छायाचित्र दाखवले आहे. तिने तिच्या पात्राला गीतांजली नाव दिले आहे. तिने सुंदर अशी लाल आणि पांढऱ्या रंगाची साडी घातली आहे. हा तिचा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला असून तिचे चाहते हे पोस्टर सोशल मिडीयावर अपलोड करताना दिसून येत आहेत.
Rashmika Mandanna बरोबर Ranbir Kapoor आणि Anil Kapoor ‘Animal’ चित्रपटात दिसणार आहेत. 28 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांच्या हस्ते Animal चा टीझर प्रदर्शित होणार आहे.