सोलापूर : प्रतिनिधी
अल्पवयीन मुलीचा विनयभंग करुन तिला ठार मारण्याची धमकी देऊन पळुन गेलेल्या आरोपीला न्यायाधीशांनी जामिनावर मुक्तता केली.
घडलेली घटना अशी की, अक्कलकोट तालुक्यातील विकास रंगनाथ कोळी याच्याविरूध्द अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. फिर्यादी अल्पवयीन मुलगी ही शेतात जनावरे चारण्याकरिता गेली होती. जनावरे चारत असताना तेथे विकास कोळी आला व त्याने फिर्यादीचा हात धरुन तु मला खुप आवडतेस, तुला 500 रूपये देतो, असे म्हणाला. यावेळी फिर्यादी मुलीने आरडाओरड केल्यावर आरोपीने तोंड दाबुन ओरडु नको, नाहीतर तुला खलास करतो, अशी धमकी दिली. फिर्यादीचा भाऊ ओरडण्याचा आवाज ऐकुन तिथे येत असल्याचे पाहुन आरोपीने तुझ्या भावाला याबद्दल सांगितले तर तुला बघुन घेईन, अशी धमकी देत तिचा विनयभंग करुन पळुन गेला. याप्रकरणी आरोपीच्या वकीलांनी जिल्हा व सञ न्यायालयात जामीनचा अर्ज दाखल केला. यामध्ये आरोपीच्या वकीलाचा युक्तीवाद ग्राह्य धरुन जिल्हा व सञ न्यायाधीश शिरभाते यांनी त्यास जामीन मंजूर केला. यामध्ये आरोपीतर्फ ॲड. व्ही. डी. फताटे, ॲड. संतोष म्हमाणे यांनी तर सरकारपक्षातर्फे ॲड. प्रकाश जन्नू यांनी काम पाहीले.
हे ही वाचा तलाठी पेपर फुटी संदर्भात पुरावे देऊनही निवड यादी जाहीर
सर्फराजच्या टीम इंडियातील एन्ट्रीवर पाकिस्तानी खेळाडूकडून शुभेच्छा
आंबेडकर आंतरराष्ट्रीय मिशनच्यावतीने अमेरिकेत प्रजासत्ताक दिन साजरा