सत्ताकारण न्युज नेटवर्क : पुणे
उपसंचालक कार्यालय, कोल्हापूर मंडळातून उपसंचालक कार्यालय, पुणे मंडळात अंतर बदलीने आलेल्या एका आरोग्य सेवकाला प्राथमिक आरोग्य केंद्र, बावडा (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील रिक्त पदावर नेमणुक हवी होती. या नेमणुकीसाठी तक्रारदाराकडून आरोग्य सेवा, पुणे मंडळाचे उपसंचालक डॉ. भगवान पवार यांच्या नावे आरोग्य सेवक रामकिसन गंगाधर घ्यार याने 3 लाख रूपयांची मागणी केली. मागणी केलेली 3 लाख रूपये रक्कम आरोग्य सेवक रामकिसन गंगाधर घ्यार याने स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी घ्यार याला रंगेहाथ पकडून अटक केली.
हे ही वाचा आरोग्य मंत्र्यांना CM करायचं आहे, आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी प्रत्येकी लाख रूपये पाठवा
तक्रारदार यांनी दिलेल्या फिर्यादेत असे म्हटले आहे की, यातील तक्रारदार हे एक आरोग्य सेवक असून त्यांची जून 2025 मध्ये उपसंचालक कार्यालय, कोल्हापूर मंडळ ते उपसंचालक कार्यालय, पुणे मंडळ अशी अंतर मंडळ बदली झाली होती. जून 2025 पासून आजपर्यंत त्यांना पुणे मंडळात पुणे मंडळाचे उपसंचालक डॉ. भगवान पवार यांनी नेमणुक न देता उपसंचालक कार्यालयातच आरोग्य सेवक पद नसतानाही ठेवून घेतले. त्यानंतर तक्रारदार यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, बावडा, ता. इंदापूर, जिल्हा पुणे येथे रिक्त असलेल्या आरोग्य सेवकाच्या पदावर नेमणूक होण्यासाठी विनंती अर्ज केला होता. तक्रारदार यांनी त्यांच्या बदलीच्या विनंती अर्जाच्या अनुषंगाने आरोग्य सेवा, पुणे मंडळाचे उपसंचालक डॉ. भगवान पवार यांना भेटले होते. त्यांनी तक्रारदारास आरोग्य सेवक रामकिसन गंगाधर घ्यार यांना भेटण्यास सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदार हे यातील आरोपी घ्यार यांना भेटले. योवळी घ्यार याने उपसंचालक डॉ. भगवान पवार यांच्यासाठी 3 लाख द्यावे लागतील, असे सांगून 3 लाख रुपये लाचेची मागणी केली. याबाबतची तक्रार ही तक्रारदाराने 2 डिसेंबर 2025 रोजी पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली होती. तक्रारदार यांच्या तक्रारीनुसार 4 डिसेंबर 2025 व 5 डिसेंबर 2025 रोजी पडताळणी केली असता, आरोपी लोकसेवक रामकिशन घ्यार यांनी तक्रारदार यांचे बदलीच्या कामासाठी तक्रारदाराकडे उपसंचालक डॉ. भगवान पवार यांच्याकरीता 3 लाख रूपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. पुढे 2 जानेवारी 2026 रोजी रामकिशन घ्यार यांने तक्रारदार कडून उपसंचालक डॉ. भगवान पवार यांच्यासाठी मागणी केलेली 3 लाख रुपये लाचेची रक्कम तक्रारदाराकडून स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.
हे ही वाचा आरोग्य मंत्र्यांच्या नावे 25 लाखांची मागणी; आरोग्य विभागातील “राखी सावंत”चा अजब कारभार
यावेळी घ्यार याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाणे, पुणे शहर येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 नुसार गुन्हा नोंद केला. सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे परिक्षेत्र, पुणे चे पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, व अपर पोलीस अधीक्षक अजीत पाटील, अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
हे ही वाचा आरोग्य विभागातील 32 वर्षांच्या अविरत आरोग्य सेवेनंतर प्रविण सोळंकी निवृत्त
जिल्हा रूग्णालयात 92 बालरूग्णांच्या मोफत गंभीर शस्त्रक्रीया यशस्वीपणे संपन्न
बोगस “प्रयोगशाळा तंत्रज्ञ पद भरती”चा मुद्दा भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्या निशाण्यावर




