- आठ हजार रुपयांचा मद्यसाठा जप्त
चिखली : प्रतिनिधी
रायपुर पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या पिंपळगाव सराई, घटनांद्रा, ढासाळवाडी, साखळी खुर्द या ठिकाणी ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२३ आहेत. यामध्ये जनतेतून थेट सरपंच व ईतर सदस्य यांची निवडणूकी करिता रविवारी, 5 नोव्हेंबर रोजी मतदान झाले आहे. त्या अनुषंगाने रायपूर पोलीस स्टेशन हद्दीत हातभट्टी, देशी दारुचा अवैध साठा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत आठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
हे ही वाचा दिवाळीपूर्वी सिंदखेड राजा तालुका दुष्काळी घोषित करा : सविता मुंढे यांची मागणी
कोणत्याही निवडणूकीमध्ये प्रचार हे वेग-वेगळ्या पद्धतीचे ठरलेले असतात. त्यातच निवडणुकीची संधी साधून ग्रामीण भागात अवैध्य धंदे करणारे देखील याच संधीचा फायदा घेत असतात. या बाबीला घेऊन रायपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दुर्गेश राजपुत यांनी यावेळी त्यांची टीम बनवून सदर ग्रामपंचायत निवडणूक शांतता पूर्वक पार पाडण्यासाठी नियोजन केले होते. मागील काही दिवसात अवैध्य धंदे करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला असून त्यामध्ये 4 नोव्हेंबर 2023 रोजी माहिती मिळाली की, निवडणूक अनुषंगाने काही ठिकाणी दारूचा अवैधयसाठा होत आहे. त्यावरून ठाणेदार दुर्गेश राजपूत यांनी चमू बनवून साखळी खुर्द, पांगरी, ढासाळवाडी येथे हातभट्टी, देशी दारूचे बॉक्स पकडुन एकूण 3 गुन्हे दाखल करून 8 हजार रुपयांचा मुद्देमाल पकडण्यात आला. या साठेबाजावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर कारवाईमुळे ऐन निवडणूक अनुषंगाने दारू विक्री करणाऱ्यांचे प्रयत्न फेल ठरले आहेत.
ही कारवाई पोलीस निरिक्षक दुर्गेश राजपूत यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक बस्टेवड, सहाय्यक पोलीस निरिक्षक सावळे, हेकाँ घाटे, हेकाँ रजिक शेख, हेकाँ पालवे, नापोकाँ संदीप जाधव यांनी केली आहे.
हे ही वाचा 18 Crore Jobs | मोदींना 9 वर्षात 18 कोटी रोजगारांच्या आश्वासनांचा पडला विसर – राहुल बोंद्रे
Power Of farmers | सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या एकजुटीची ताकद दाखवून देऊ : रविकांत तुपकर