सोलापूर : प्रतिनिधी
आषाढी वारीमध्ये पुणे सर्कलमधील तिन्ही जिल्ह्याचे रँकींग सुधारा, सर्व विषयांचे समन्वयकांनी अंतर्गत समन्वय साधून चांगले काम करा, वारकऱ्यांना दर्जेदार आरोग्य सेवा द्या, अशा सूचना सहसंचालक, आरोग्य सेवा (हिवताप, हत्तीरोग व जलजन्य रोग) पुणे तथा पुणे विभागाचे उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांनी संबंधीत सर्व अधिकाऱ्यांना दिल्या.
हे ही वाचा सोलापूर विभागात मनमानी कारभारातून एसटी महामंडळाची आर्थिक लूट
सहसंचालक, आरोग्य सेवा (हिवताप, हत्तीरोग व जलजन्य रोग) पुणे तथा पुणे विभागाचे उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांनी बुधवार (22 मे 2024 रोजी) विभागातील सर्व जिल्हा शल्य चिकीत्सक, सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक, एसटीएस, एसटीटीएस यांची आढावा बैठक व पालखी पूर्वतयारीसाठीची बैठक व्हिसीव्दारे घेतली. यावेळी त्यांनी संबंधीत सर्वांना सूचना दिल्या.
हे ही वाचा आरोग्य मंत्र्यांना CM करायचं आहे, आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी प्रत्येकी लाख रूपये पाठवा
यावेळी सहसंचालक डॉ. पवार यांनी सन 2024-25 मधील पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी वारीनिमित्त करावयाच्या उपाययोजना, तिन्ही जिल्ह्यातील पालखीमार्गावर वारकऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य सेवा यासंदर्भात उपस्थित अधिकाऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले. गत सालापेक्षा चांगल्या आरोग्य सेवा पुरविणे, वारी हायटेक करणे आणि याकामी निधीची तरतुद करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. पाणी शुध्दीकरण, कीटकजन्य आजार नियंत्रणासाठी कंटेनर सर्व्हे, पाणी नमुने तपासणी, औषध खरेदी, टीसीसी, मेडिक्लोअर खरेदी आदी बाबी वेळेत व्हाव्यात व वारकऱ्यांना चांगली आरोग्य सेवा मिळेल याची सर्वांनी दखल घ्यावी, असेही सांगितले. आरोग्य दूत म्हणून तिन्ही जिल्ह्यातील क्षयरोग विभागातील एसटीएस, एसटीएलएस व सीएचओ यांनी कामकाज पहावे, त्यांचे नियोजन DHO आणि DTO यांनी करावे, अशा सूचना डॉ. पवार यांनी दिल्या. तसेच पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य सोयी-सुविधांचे नियोजन व प्रत्यक्ष कृती कार्यक्रम तसेच विविध राष्ट्रीय कार्यक्रमांची जनजागृती होणेकामी मोठ्या प्रमाणात IEC खरेदी होणे गरजेचे आहे. या IEC खरेदी संदर्भात नियुक्ती झालेल्या पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी यांची जबाबदारी राहील. तसेच संबंधीत जिल्हा शल्य चिकीत्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी संबंधीत जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी यांच्यामार्फत सर्व टिपण्या, छपाई, खरेदी करण्याचे स्पष्ट आदेश डॉ. पवार यांनी दिले. तसेच सन 2024-25 मधील आषाढी वारीमध्ये आरोग्य विभागा मार्फत आरोग्य शिबिरे राबविण्याच्या सूचना देत सर्वांनी जबाबदारीने व वेळेत कामकाज करण्याच्या सूचना व आदेश सहसंचाल डॉ. राधाकिशन पवार यांनी दिले.
हे ही वाचा महिला व नवजात शिशु रुग्णालयात प्रथम रुग्ण व प्रथम कन्येचे समारंभपुर्वक स्वागत
जिल्हा रूग्णालयातील “हिमोफिलिया डे केअर सेंटर”चा लाभ रुग्णांनी घ्यावा