सोलापूर : प्रतिनिधी
Police Shot Himself : येथील जिल्हा कारागृहामध्ये गार्ड म्हणून सेवेत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने स्वतःला भावपूर्ण श्रध्दांजली वाहत स्वतःवर तीन गोळ्या झाडून घेतल्याची घटना आज घडली. यापूर्वी सोलापूरात दोन पोलिसांनी वरिष्ठांची नावे चिठ्ठीत लिहून स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्याची घटना ताजी असताना सध्या पुन्हा एक अशीच घटना घडली आहे. यामुळे सोलापूर शहर-जिल्ह्यातच नाही तर राज्यातील पोलिस दलात खळबळ माजली आहे.
सदरची घटना आज (शनिवार, दि. 9 डिसेंबर) सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास घडली. स्वतःवर गोळ्या झाडलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव विकास गंगाराम कोळपे (वय ३७, रा. जिल्हा कारागृह वसाहत, सोलापूर) असे आहे.
हे ही वाचा भाऊबीजेच्या दिवशी स्वतःवर गोळी झाडून पोलीसाची आत्महत्या
विकास कोळपे यांनी हे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी स्वतःच्या फेसबूक अकाउंटवर दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे घेतली आहेत. या अधिकाऱ्यांच्या त्यांच्या त्रासाला कंटाळून आपण हे पाऊल उचलत असल्याचे म्हटले आहे. त्यात स्वतःच्याच पोस्टवर स्वतःसाठी भावपूर्ण श्रद्धांजली सिंघम असेही नमूद केले आहे.
हे ही वाचा Police Shot Himself | पोलीस अधिका-याने स्वतःवर गोळी झाडून संपवले आयुष्य
विकास कोळपे हे पुण्यातील देवाची आळंदी येथील मूळचे रहिवाशी असून घरी आई, वडील, भाऊ, पत्नी आणि अडीच वर्षाचा मुलगा असा परिवार आहे. विकास यांनी स्वतःवर गोळ्या झाडल्याच्या घटनेने सोलापूरसह राज्यातील पोलिस दलात एकच खळबळ माजली आहे. विकास हे गेल्या 2 वर्षांपूर्वी सोलापुरातील जिल्हा कारागृहात बदलून आले होते. त्यांनी यापूर्वी 2013 मध्ये कोल्हापूर, 2016 साली येरवडा जेल, पुणे, 2017 साली अहमदनगर, 2019 साली सांगली आणि 2021 मध्ये सोलापूर जिल्हा कारागृहात मुख्य प्रवेशद्वारात गार्ड म्हणून कर्तव्य बजावत होते. शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांनी स्वतः जवळील SLR बंदुकीतून स्वतःवरच 3 गोळ्या झाडून घेतल्या. या गोळ्या छाती आणि खांद्यात घासून गेल्या असल्या तरी ते यामुळे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर जिल्हा कारागृहातील वरिष्ठ अधिकारी व इतरांनी भेटी देऊन सदर प्रकरणाची माहिती घेतली. दरम्यान यातील पोलिस शिपाई विकास कोळपे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलले असल्याचे समोर आले आहे.
