PM E Bus Seva : जनतेचा प्रवास सुखकर आणि गतीमान होण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. दुसरीकडे पर्यावरणातील प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारच्या विशेष समितीच्यावतीने PM E Bus Seva सेवा ही योजना राबविली जात आहे. ज्यामध्ये राज्यातील 15 शहरांचा समावेश आहे.
राज्यातील महापालिका क्षेत्रातील जनतेचा प्रवास नवीन वर्षांपासून आरामदायी आणि सुखकर होणार आहे. यासाठी केंद्राने PM E Bus सेवा प्रकल्पा अंतर्गत तब्बल 1 हजार 300 वातानुकूलित बसेस मंजूर केल्या आहेत. येत्या दोन महिन्यात या बसेस महापालिका परिवहन समितीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. यामध्ये नागपूर, कोल्हापूर, ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर यासह 15 शहरांचा समावेश आहे. यासाठी केंद्राकडून तब्बल 500 कोटींपेक्षा अधिक निधी खर्च केला जाणार आहे.
हे ही वाचा Wife’s Death | पत्नीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दारुड्या पतीस 5 वर्ष सक्षम कारावासाची शिक्षा
राज्यातील बहुतांशी महापालिका क्षेत्रात सुरू असलेली परिवहन सेवा ही तोट्यात सुरू आहे. काही ठिकाणी बसेसची संख्या प्रचंड कमी आणि वरून त्यांची स्थिती खराब आहे. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होताना दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर जनतेचा प्रवास सुखकर होण्यासाठी, प्रदूषण कमी व्हावे यासाठी केंद्र सरकारच्या विशेष समितीच्या वतीने ही सेवा सुरू केली आहे. देशभरातील शहरातून यासाठी PM E Bus Seva देण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. यातून देशभरातून आलेल्या प्रस्तावाबाबत केंद्र, राज्य व महापालिका अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली. त्यानंतर गुरूवारी पुन्हा अंतिम चर्चा झाल्यानंतर देशभरातील शहरांसाठी 3 हजार 162 बसेस मंजूर करण्यात आल्या. यामध्ये महाराष्ट्राचा वाटा तब्बल 1 हजार 290 इतका आहे. तसेच गुजरात, हरियाणा, जम्मू-काश्मिर, ओडिसा आणि पंजाब अशा विविध राज्यांना देखील या बसेस मिळणार आहेत.
हे ही वाचा शेतकऱ्याचा वीज पुरवठा सुरळीत न केल्यास आंदोलन तीव्र करणार – आमदार धीरज लींगाडे
यातील प्रत्येक बसची किंमत 40 लाख रूपये आहे. येत्या 2 महिन्यात या बसेस त्या-त्या शहरात दाखल होतील. त्यांची पार्किंग, चार्जिंग व इतर सुविधांची तयारी तोपर्यंत करण्याची मुदत देण्यात आली आहे. नवीन वर्षात या बसेस दाखल होणार असल्याने नव्या वर्षात महाराष्ट्रातील 15 शहरातील प्रवास वातानुकूलित होण्यास मदत होणार आहे.
शहरे व मंजूर बसेस
150 बसेस : नागपूर, ठाणे.
100 बसेस : छत्रपती संभाजीनगर, कल्याण, डोंबिवली, नाशिक, विरार, भिवंडी, मिरा भाईंदर, कोल्हापूर, सोलापूर, उल्हासनगर.
50 बसेस : लातूर, अहमदनगर, अमरावती.
हे ही वाचा एक कोटीची लाच, MIDC तील सहाय्यक अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात