सोलापूर : विशेष प्रतिनिधी
Corruption in CS Office : येथील जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालयात विविध सेवा, सुविधांसाठी येणाऱ्या सर्वसामान्य जनतेपासून ते शासकीय, निमशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांकडून टक्केवारी घेतल्याशिवाय कामे केली जात नाहीत. जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. धनंजय पाटील हे प्रामाणिकपणे काम करत असताना दुसरीकडे त्यांच्याच कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी आणि एजंट टक्केवारी घेऊन राजरोसपणे कामे करून देत आहेत. त्यामुळे जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालयात टक्केवारी घेणाऱ्यांची टोळी कार्यरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालयातील ओएस विष्णू पाटील यांनी वर्ग 4 च्या अनुकंपा मधील उमेदवारांकडून पैसे घेऊन ऑर्डर दिल्या आहेत. टक्केवारी (Percentage in CS Office) घेऊन मेडिकल बिले काढून देत आहेत, तसेच ते ग्रामीण आणि उपजिल्हा रूग्णालयातील कर्मचाऱ्यांची कामे करण्यासाठी पैसे घेतल्याशिवाय फाईल पुढे ढकलत नाहीत.
हे ही वाचा आरोग्य मंत्र्यांच्या बंधूंची “आरोग्य विभागात लुडबुड”
जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालयात बॉम्बे नर्सिंग होम ऍक्ट मधील हॉस्पिटलचे नवीन परवाने आणि नूतनिकरणसाठी लोमटे यांच्या बरोबर संगणमत करून विष्णू पाटील हे एजन्ट ईसाक शेख मार्फत टक्केवारी घेऊन कामे करत आहेत. एजंट र्इसाक शेख हा सर्व चलणाची फी, सर्व कागदपत्रे आणि टक्केवारीचे पैसे थेट जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालयात घेऊन येतो. त्यानंतर बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट मधील परवाने ईसाक शेख च्या हाती प्रक्रिया राबवून दिले जातात. ईसाक शेख हा संबंधीत प्रकरणातील पैशाचे व्यवहार चक्क जिल्हा शल्च चिकीत्सक कार्यालयातच पार पाडतो, हे विशेष.
जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालयात दुसरीकडे PCPNDT मध्ये काकडे आणि ओएस विष्णू पाटील यांची जोडी कार्यरत आहे. PCPNDT मधील मान्यता आणि नुतनीकरणासाठी टक्केवारी घेऊन कामे केली जात आहेत. ज्यांच्याकडून टक्केवारी दिली जात नाही, त्यांची प्रकरणे सर्वात आगोदर सादर होऊनही प्रलंबीत आहेत. तर ज्यांची टक्केवारी मिळाली आहे, त्यांची प्रकरणे उशिरा सादर होऊनही सर्वात आगोदर निकाली काढण्यात येत आहेत.
हे ही वाचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांच्या प्रतिमा जाळण्याचा प्रयत्न
या सर्व प्रकरणात विष्णू पाटील, काकडे, लोमटे आणि एजंट ईसाक शेख यांचे जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालयातील देवाणघेवाणीचे व्हिडीओ ‘सत्ताकारण न्युज नेटवर्क’च्या हाती लागले आहेत. तसेच वरील सर्वजन जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. धनंजय पाटील यांचे नाव पुढे करून टक्केवारी वसुलीचे काम करत आहेत. एकीकडे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. धनंजय पाटील हे स्वतः 14 ग्रामीण रूग्णालये आणि 3 उपजिल्हा रूग्णालयाच्या ठिकाणी वारंवार दौरे करून कामे सुरळीत पार पाडत आहेत. आरोग्य यंत्रणा सक्षम करत आहेत. तसेच पंढरपूरच्या आषाढी यात्रेपासून ते मुंबई-पुणे येथील बैठकांपासून ते आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या आरोग्य शिबिरापर्यंत ते आरोग्य यंत्रणा सुरळीत कार्यान्वित करत आहेत. ते स्वच्छ व पारदर्शकपणे काम करत असताना त्यांच्या नावाचा वापर करून विष्णू पाटील, काकडे, लोमटे आणि एजंट ईसाक शेख हे सर्वसामान्यांपासून ते शासकीय-निमशासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची लूट करण्यात दंग आहेत. याकडे प्रधान सचिव मिलींद म्हैसकर यांनी लक्ष देण्याची गरज असून जवळपास राज्यातील सर्वच जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालयात अशाच पध्दतीने लूट सुरू आहे.