Pakistan Squad World Cup | पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने 2023 मध्ये एकदिवसीय विश्वचषकासाठी संघाची घोषणा केली आहे. वर्ल्डकपसाठी पाकिस्तानकडून कोण खेळणार? याबाबत क्रिकेट चाहत्यामध्ये उत्सुकता होती.
सध्या जाहीर झालेल्या खेळाडूमध्ये नसीम शाह याचे नाव नाही. हा वेगवान गोलंदाज संघात नाही, कारण त्याला आशिया कप स्पर्धेदरम्यान दुखापत झाली होती. त्याऐवजी हसन अली हा दुसरा खेळाडू विश्वचषक स्पर्धेत खेळणार आहे. इंझमाम-उल-हक याने सांगितले की, केवळ दीर्घकाळ खेळत असलेल्या खेळाडूंची निवड करण्यात आली. या स्थितीत संघाने चांगली कामगिरी करावी अशी आमची इच्छा आहे. Pakistan Squad World Cup
वर्ल्डकप 2023 साठी पाकिस्तानचा संघ
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, सलमान आगा, सौद शकील, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, सॅम मीर, हारिस रौफ, मोहम्मद वसीम जूनियर, हसन अली आणि शाहीन आफ्रिदी. Pakistan Squad World Cup