Amit Shah | लालबाग राजाच्या दर्शनासाठी बॉलीवूडमधील अभिनेते-अभिनेत्री, क्रिकेट स्टार यांच्या रांगा दरवर्षी लागतात. त्यानंतर आता राजकीय नेत्यांमध्ये देखील दर्शनाची क्रेझ असून देशाचे गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) हे मुंबईला लालगाब राजाच्या दर्शनासाठी येणार आहेत.
सध्या मुंबईत गणेशोत्सव दरवर्षी प्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात सुरू आहे. याच लालबाग राजाच्या दर्शनासाठी अमित शहा (Amit Shah) मुंबईत येणार आहेत. त्याआधी ते एका राजकीय नेत्याच्या घरी गणपती पाहण्यासाठी जाणार आहेत. त्यानंतर ते लालबागच्या राजाचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही घरी जाऊन गणपतीच्या मूर्तीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते दिल्लीला रवाणा होणार आहेत. त्यांच्या दौऱ्यात कोणताही मोठा राजकीय कार्यक्रम होणार नाही, फक्त महत्त्वाच्या व्यक्तींच्या भेटीगाठी आणि गणपती पाहण्यासाठी ते येणार असल्याचे भाजपने सांगितले.Amit Shah