सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर शहरात जवळपास दीड लाख मुस्लिम मतदार आहे. परंतु आजपर्यंत सोलापूर शहराततील कोणत्याही विधानसभा मतदारसंघांमध्ये मुस्लिम समाजाला उमेदवारी न मिळाल्यामुळे प्रतिनिधित्व करता आलेले नाही. गेल्या अनेक वर्षापासून मुस्लिम समाज काँग्रेसचा पारंपारिक मतदार म्हणून ओळखला जातो. परंतु काँग्रेसने प्रत्येक वेळी या समाजाला डावल्यामुळेच हा समाज एमआयएमकडे जाण्याची दाट शक्यता निर्माण झालेली असतानाच आता शिवसेना शिंदे गटाचे अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष मुस्ताक मेहबूब शेख यांनी “शहर मध्य” विधानसभा मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी मिळावी, अशी मागणी श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेतून व्यक्त केली आहे.
हे ही वाचा वरिष्ठांचा आदेश डावलून सांख्यिकी व्यतिरिक्त गैरप्रकारे इतर कामकाज पाहणाऱ्या काकडेंना बडतर्फ करा
यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना मुस्ताक शेख म्हणाले, शहर मध्य मतदार संघातील मुस्लिम समाजाला न्याय देण्यासाठी आणि राज्यातील मुस्लिम समाजासाठी अभिमानाची गोष्ट म्हणून शहर मध्य मतदार संघातून मला उमेदवारी मिळाल्यास निश्चितच याची सर्वत्र कौतुक केले जाईल. पुरोगामी विचार आणि सक्षम लोकशाहीच्या दृष्टीने निश्चितपणे माझ्या उमेदवारीचे सर्वत्र चांगले पडसाद उमटतील यात तिळमात्र शंका नाही.
हे ही वाचा सोनोग्राफी सेंटर परवानगी : सिव्हील सर्जनसाठी काकडेंनी मागितले 70 हजार रूपये
पुढे बोलताना मुस्ताक शेख म्हणाले की, सोलापूर शहर हे बहुभाषिक शहर असून या शहरांमध्ये सर्व समाजाचे लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत. आजवर मुस्लिम समाजाने काँग्रेसला प्रत्येक निवडणुकीत चांगले मताधिक्य दिले आहे, तरी मुस्लिम मतदारांकडे फक्त काँग्रेसचा मतदार म्हणून पाहिला जाते. हा बसलेला शिक्का पुसला जावा, त्याचबरोबर लोकशाही आणि राष्ट्रीय एकात्मता बळकट व्हावी या दृष्टीने शहर मध्य मतदार संघातून मुस्ताक भाईंनाच शिवसेनेकडून उमेदवारी मिळावी, अशी मागणी कार्यकर्त्यांमधून होत आहे.
या पत्रकार परिषदेला मोहसीन ट्रंकवाले, रूकमुद्दीन मिस्त्री, एजाज सय्यद, पाचुदार शेख आदी समाज बांधव व कार्यकर्ते उपस्थित होते.
हे ही वाचा पार्किंगच्या जागेत अनधिकृतरित्या उभारलेल्या उद्योग-व्यवसायांचा अहवाल आयुक्तांच्या टेबलवर