मुंबई : प्रतिनिधी
Mukesh Ambani Threat : भारतातील सर्वाधिक श्रीमंत उद्योगपती आणि Reliance Industries चे चेअरमन Mukesh Ambani यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याच्या (Mukesh Ambani Threat) धमकीचा ईमेल आला आहे. अज्ञात व्यक्तीने ही धमकी दिली आहे. ज्याने 27 ऑक्टोबर रोजी 2 ईमेल पाठवले होते. त्यामध्ये त्याने 200 कोटी रुपयांची मागणी केली होती. आता तिसऱ्यांदा ईमेल करून त्या व्यक्तीने खंडणीची रक्कम वाढवून 200 कोटी रूपयांवरून 400 कोटी रुपये केली आहे. या धमकीचे गांभीर्य लक्षात घेत मुंबई पोलिसांनी मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील निवासस्थानी सुरक्षा वाढवली आहे.
हे ही वाचा Maratha Reservation | आरक्षणासाठी राज्यभरातील मराठा समाज आक्रमक
याबाबत अधिक माहिती अशी की, उद्योगपती Mukesh Ambani यांना पहिल्या धमकीचा ईमेल 26 ऑक्टोबर रोजी आला होता. यामध्ये धमकी देणाऱ्या व्यक्तीने सुरवातीला 20 कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर त्याची किंमत 200 कोटी रुपये केली. तसेच मागणी केलेले पैसे न दिल्यास मुकेश अंबानींना गोळ्या घालू, असेही धमकीच्या मेलमध्ये त्या व्यक्तीने म्हटले आहे. हा धमकीचा ईमेल मिळताच मुकेश अंबानी यांच्या सुरक्षा प्रभारींच्या तक्रारीच्या आधारे, गावदेवी पोलिसांनी आयपीसीच्या कलम 387 आणि 506 (2) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. मात्र त्याच अज्ञात व्यक्तीने आता खंडणीची रक्कम 400 कोटींपर्यंत वाढवून मागितली आहे. आरोपीने धमकी देणाऱ्या तिसऱ्या ईमेलमध्ये लिहिले आहे की, “आता 400 कोटी रुपये वाढवून मागितले आहेत. पोलीस माझा शोध अजिबात घेऊ शकत नाहीत, त्यामुळे ते मला अटकही करू शकत नाहीत. त्यामुळे आम्हाला तुम्हाला मारण्यास काहीच अडचण नाही. मग तुमची कितीही चांगली सुरक्षा असली तरीही. आमचा एकमेव स्नायपर आहे, तो तुम्हाला मारू शकतो, असे त्यात म्हटले आहे. Mukesh Ambani Threat
दरम्यान मुकेश अंबानींना अशा प्रकारच्या धमक्या मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षीही Mukesh Ambani आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्यानंतर धमकीचे कॉल केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी बिहारमधील दरभंगा येथून एका व्यक्तीला अटक केली होती. सदरच्या आरोपीने मुंबईतील सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती. Mukesh Ambani Threat
हे ही वाचा जाणून घ्या Dark Chocolate खाण्याचे फायदे