चिखली : प्रतिनिधी
Mismanagement of MSEB : रब्बीच्या हंगामाला नुकतीच सुरुवात झाली असून तूर, हरबरा, मका, गहू तसेच भाजीपाला पिकाला शेतकऱ्यांची पाणी देण्यासाठी लगबग सुरू आहे. असे असतांना दुसरीकडे मात्र महावितरणच्या भोंगळ तथा नियोजनशून्य कारभारामुळे जिल्हाभरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. परिणामी चिखली तालुक्यातील हराळखेड येथील शेतकऱ्यांनी काँग्रेस नेते राम डहाके व तालुकाध्यक्ष समाधान सुपेकर यांचे नेतृत्वात 8 नोव्हेंबर रोजी या भोंगळ कारभाराविरोधात शेतकरी आक्रमक झाला असून त्यांनी अमडापूर महावितरण कार्यालयात कर्तव्यावर गैरहजर असलेल्या साहाय्यक अभियंत्यांच्या खुर्चीला निवेदन चिटकवीत निषेध व्यक्त करून आंदोलनाचा इशारा दिला.
हे ही वाचा रायपूर पोलीसांची अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई
यावर्षीचा अत्यल्प पाऊस, उत्पादनात झालेली प्रचंड घट, त्यातच उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतमालाला मिळत असलेला कमी भाव यामुळे बळीराजा अडचणीत सापडला आहे. वर्षभराचा खर्च, दैनंदिन उदरनिर्वाह, शिक्षण, आजारपण, लग्न या सर्वच बाबी शेती वर अवलंबून आहेत. कमी पर्जन्यमानामुळे विहिरी, तलाव तसेच बोअर वेल मध्ये असलेला अत्यल्प पाणी साठ्यावर सिंचन करून आपली पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. असे असतांनाच शेती पंपाना महावितरणकडून सुरळीत वीज (Mismanagement of MSEB) पुरवठा होत नाही. त्यामुळे अमडापूर उदयनगर तसेच ईसोली परीसरातील शेतकऱ्यांमध्ये शासनाच्या विरोधात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. हराळखेड येथील शेतकऱ्यांना गेल्या 10 दिवसांपासून रात्री अपरात्री 1-2 तासच वीज मिळते. कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे कृषी पंप निकामी होऊन शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. हिंस्त्र प्राण्यांच्या जीवघेण्या हल्ल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. याकरीता सिंचनासाठी दिवसा किमान 10 तास वीजपुरवठा व्हावा, ही बाब काँग्रेस नेते राम डहाके व समाधान सुपेकर यांच्या कानावर टाकत अमडापूर शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालय गाठले. मात्र तीन तास होऊनही अभियंता कर्तव्यावर पोहचत नाही, म्हणून संतापलेल्या शेतकऱ्यांनी राम डहाके यांच्या नेतृत्वात अभियंत्याच्या रिकाम्या खुर्चीला मागण्यांचे निवेदन चिटकवीत वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला.
यावेळी सोशल मीडिया विभागाचे अमरावती विभाग समन्वयक ज्ञानेश्वर पंचांगे, विजय चौधरी, राजू गायकवाड, उद्धव सोळंकी, रवींद्र थोरात, विशाल हाडोळे, विशाल बोक्से, गोपाळ हाडोळे, विनायक मुळे, गणेश हाडोळे, सुरेश हाडोळे, सुनील येवले, निवृत्ती जाधव, विष्णू देवा, अनिकेत गायकवाड यांच्यासह हराळखेड येथील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. Mismanagement of MSEB
हे ही वाचा मराठा समाजाला कुणबी दाखले देण्यासाठी शासकीय विभागांनी पुराव्यांची तपासणी करावी
दिवाळीपूर्वी सिंदखेड राजा तालुका दुष्काळी घोषित करा : सविता मुंढे यांची मागणी