सोलापूर : विशेष प्रतिनिधी
MD Drugs : मुंबई गुन्हे शाखेकडून सोलापूरात 116 कोटी रूपये किंमतीचे मेफेड्रोन (MD Drugs) अंमली पदार्थांचा साठा जप्त करत मोठी कारवाई केली आहे. यामध्ये सोलापूरातील 2 आरोपींना अटकही करण्यात आली आहे. या कारवाईमुळे राज्य आणि देशभरात एकच खळबळ माजली असून यासंबंधीत मोठे रॅकेट पोलिसांच्या हाती लागले आहे.
हे ही वाचा औषध खरेदी प्रक्रीयेचे टेंडर रद्द करा, अन्यथा आरोग्य मंत्र्यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करणार
MD Drugs चा 116 कोटींचा साठा जप्त
मुंबई गुन्हे शाखेकडून सोमवारी, 16 ऑक्टोबर 2023 रोजी 16 कोटी रूपये किंमतीचे 8 किलो मेफेड्रोन (MD Drugs) अंमली पदार्थ साठा बाळगणाऱ्या दोन आरोपीस अटक केली. तसेच यासंबंधीत सोलापुर येथिल मेफेड्रोन (एमडी) अंमली पदार्थ निर्माण करणाऱ्या फॅक्टरी मधुन अंदाजे 100 कोटी रूपये किंमतीचा सुमारे 50 ते 60 किलो निर्माणाधिन मेफेड्रोन (एमडी) चा कच्च्या साठा जप्त करून त्याची फॅक्टरी ही सील केली आहे.
MD Drugs मध्ये सोलापूरातील दोघांचा समावेश
सोलापूरातील मोहोळ तालुक्यातील चिंचोळी एमआयडीसीतील एका फॅक्टरीवर मुंबई क्राईम ब्रॅंचच्या ९ नंबर पथकाने थाडसी कारवाई केली. यावेळी यातील कंपनीला सील ठोकले आहे. तर मुंबईत एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या सोलापूरातील बाळे येथील राहुल किसन गवळी आणि अतुल किसन गवळी या दोघांना या पथकाने जेरबंद केले आहे. सदरची कारवाई या पथकाचे प्रमुख तथा इन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
MD Drugs मधील आरोपींना पोलिस कोठडी
सरकारने बंदी घातलेले एमडी हे केमिकल ड्रग्ज आरोग्यासाठी फार घातक असल्याचे मानले जाते. त्यामुळे यावर बंदी घातली आहे. असे असताना मुंबई क्राईम ब्रॅंचने मुंबई येथे राहुल किसन गवळी आणि अतुल किसन गवळी यांना सदरचे ड्रग्ज विकताना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १६ कोटी रुपयांचे 8 किलो एमडी ड्रग्ज हस्तगत केले आहे. पोलिसांनी त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने यातील दोघांनाही १९ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
सध्या सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र पाटील यांच्याकडे या प्रकरणाचा तपास आहे. दरम्यान यातील दोघांना मुंबईतून अटक केल्यानंतर रविवारी (ता. 15 ऑक्टोबर 2023) क्राईम ब्रॅंचच्या अधिकाऱ्यांनी मोहोळ येथे येऊन चिंचोळी एमआयडीसीतील या कंपनीला सील ठोकले. सध्या सदरचे MD Drugs कधीपासून अनधिकृत ड्रग्ज तयार केले जात आहे ? याकरीता त्यांनी कोठे-कोठे त्याची विक्री केली आहे ? याचा सखोल तपास पोलिस यंत्रणा करत आहे.