सत्ताकारण न्युज नेटवर्क : सोलापूर
सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी विनायक कोंड्याल यांची बिनविरोध झाली. त्यांनी नुकताच महापौर पदाचा पदभार स्विकारला. यामुळे सोलापूर महानगरपालिका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनकडून महापौर विनायक कोंड्याल यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला. यावेळी सोलापूर महानगरपालिका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष रामभाऊ दुधाळ यांनी फेटा, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
याप्रसंगी सोलापूर महानगरपालिका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे पदाधिकारी गणेश आप्पा नरोटे, यशवंत पाथरूट, सागर राठोड, दिनेश अलकुंडे, दिनेश पवार, श्री. वाघमारे, भीमा राठोड, अक्षय राठोड, अभिजीत पांगळे, श्री. कानडे, श्री. नरळे, शंकर निंबाळकर आदी सर्व पदाधिकारी व सर्व मक्तेदार यावेळी उपस्थित होते.

हे ही वाचा आरोग्य मंत्र्यांच्या नावे 25 लाखांची मागणी; आरोग्य विभागातील “राखी सावंत”चा अजब कारभार
डॉ. संतोष नवलेंच्या विभागीय चौकशीसाठी संचालकांकडे दोषारोप पत्र सादर
तीन टक्के द्या, त्यानंतरच सेवाखंड कालावधी क्षमापितचा निधी घ्या…




