महानगरपालिका, इन्कम टॅक्स, उपनिबंधक विभाग करणार कारवाई
रणजित वाघमारे : सत्ताकारण न्युज नेटवर्क
‘मोतीवाला कडून NA ऑर्डर प्रमाणे लेआउट विकसित न करता ओपन प्लॉटची विक्री, रजिस्टर खरेदीखताची रक्कम आणि प्रत्यक्षात नागरिकांना प्लॉट विकल्याची रक्कम यामध्ये तफावत असून उर्वरित रक्कमेवरील टॅक्सची चोरी विकासक रफिक मोतीवाला यांच्याकडून केली जात आहे’ याबाबतचे सविस्तर वृत्त सत्ताकारण न्युज नेटवर्कने आठ दिवसांपूर्वी प्रकाशित केले होते. यावर महानगरपालिका नगर रचना विभाग, इन्कम टॅक्स विभाग आणि उपनिबंधक कार्यालयाने दखल घेतली असून कागदपत्रांची शहानिशा आणि पडताळणी करून संबंधीतांवर कारवाई करणार असल्याचे ‘सत्ताकारण न्युज नेटवर्क’ला सांगितले. त्यामुळे मोतीवाला यांचे मे. फेअरडील कंन्स्ट्रक्शन वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे दिसून येत आहे.
हे ही वाचा मोतीवाला कडून NA ऑर्डर प्रमाणे लेआउट विकसित न करता ओपन प्लॉटची विक्री
याबाबत महानगरपालिका नगर रचना विभागाचे सहायक संचालक संभाजी कांबळे यांना महापालिका प्रशासन आणि नागरिकांची फसवणूक केल्याचे निदर्शनास आणून दिले. याबाबत नगर रचना विभागाचे सहायक संचालक संभाजी कांबळे म्हणाले, संबंधीत लेआऊटची कागदपत्रे, त्याचप्रमाणे वास्तविक लेआऊटचा विकास केला आहे की नाही ? पुर्णत्वाचा दाखल्यावरील तारीख आणि प्लॉट विक्रीची तारीख, सदरच्या जागेवर जाऊन काम पूर्ण केले आहे की नाही आणि काम पूर्ण करण्याआगोदरच प्लॉटची विक्री केली आहे का ? आदी सर्व गोष्टींची पडताळणी आम्ही करू. मेहबूब शेख यांना याबाबत वस्तूस्थिती पाहण्याचे आणि कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर सदरच्या प्रकरणात दोषी आढळल्यास संबंधीतांवर नक्की कारवाई केली जाईल. याच पध्दतीने इन्कम टॅक्स विभाग, पुणे येथील अधिकाऱ्यांनी गोपणीय पध्दतीने याबरोबरच यापूर्वीचे विकासकाने केलेले व्यवहार, खरेदीदारांचे जबाब आणि इतर चौकशीअंती योग्य ती कारवाई करणार असल्याचे ‘सत्ताकार न्युज नेटवर्क’ला सांगितले.
यामध्ये उत्तर सोलापूर, सलगरवाडी (डोणगाव रोड) येथील गट नंबर 15, रॉयल पाम नावाचा लेआउट वादाच्या भवऱ्या सापडला आहे. ‘सत्ताकारण’ने प्रकाशित केलेल्या बातमीमुळे महानगरपालिका नगररचना विभाग, उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी आणि इन्कम टॅक्स ऑफिसमधील अधिकारी ॲक्शन मोडवर आले आहेत. त्यांच्याकडून कागदपत्रांची शहानिशा करून लवकरात लवकर मोतीवाला यांच्यावर कारवाई करणार असल्याचे ‘सत्ताकारण’ला सांगितले.
हे ही वाचा चंद्रकांत पाटलानंतर आता तुमच्यावर शाई फेक करू
‘मोतीवाला यांच्याकडून NA ऑर्डर प्रमाणे लेआउट विकसित न करता ओपन प्लॉटची विक्री’ या मथळ्याखाली ‘सत्ताकारण’ने बातमी प्रकाशित केली होती. सदरची प्रकाशित बातमी एकतर्फी होऊ नये, त्यांची दुसरी बाजू आणि वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी रॉयल पामचे सर्वेसर्वा रफिक मोतीवाला यांची प्रतिक्रिया मिळवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला गेला. परंतु त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रीया दिली नाही. नगररचना विभागातील अधिकाऱ्यांची संबंधित लेआउटच्या तथाकथित कारभाराबाबत प्रतिक्रिया घेण्यात आली. या प्रतिक्रियांमध्ये अधिकाऱ्यांनी प्रथमदर्शनी महापालिकेची फसवणूक झाल्याचे दिसून येत असून सर्व चौकशीअंती मोठी कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
सोलापूर महानगरपालिकेच्या नगररचना विभागाने रॉयल पाम या लेआउटला प्राथमिक मंजुरी देताना ज्या काही नियम व अटीच्या अधीन राहून मंजुरी दिली आहे. त्या नियम व अटीची पूर्तता न करताच रफिक मोतीवाला यांनी ‘मे. फेअरडील कन्स्ट्रक्शन’च्या माध्यमातून ओपन प्लॉट विकून नागरिकांची त्याचप्रमाणे प्रशासनाची मोठी फसवणूक केली आहे. मे. फेअरडील कन्स्ट्रक्शन च्या माध्यमातून सोलापूर शहर-जिल्हा व इतर जिल्ह्यातील त्याचप्रमाणे इतर राज्यातील अनेक उद्योग व्यवसाय रफिक मोतीवाला यांनी केले आहेत, अशी माहिती काही विकासकांनी सत्ताकारण न्युज नेटवर्कला दिली. या साऱ्यांची चौकशी करण्याची मागणी रॉयल पाम चे प्लॉट धारक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक करीत आहेत.
फेअरडीलच्या विरोधात उपोषण आणि न्यायालयात दाद मागणार
मे. फेअरडील कन्स्ट्रक्शन आणि त्यातील भागिदार यांनी सोलापूर शहर-जिल्हयाबरोबरच इतर जिल्ह्यातही अशाच पध्दतीने त्या-त्या महापालिकेची, इन्कम टॅक्सची चोरी करून इन्कम टॅक्स विभागाची चोरी केली आहे. उपनिबंधक कार्यालयात दस्तावेजाची आणि वास्तविक किंमती यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फरक असून यातूनही इन्कम टॅक्सची चोरी करण्यात आली आहे. मोतीवाल यांनी शासनाची, नागरिकांची फसवणूक केली आहे. ही फसवणूक पिढ्यानपिढ्या सुरू असून मोतीवाला यांच्या सर्व फर्म च्या विरोधात महापालिका, इन्कम टॅक्स विभाग आणि उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रार करून दाद मागितली आहे. तसेच संबंधीत प्रकरणाची न्यायालयातही दाद मागणार आहे. मात्र संबंधीतांवर कारवाई न झाल्यास राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करणार.
-प्रभुलिंग बिराजदार, तक्रारदार आणि सामाजिक कार्यकर्ते
हे ही वाचा MD Drugs | सोलापूरात 116 कोटी रूपये किंमतीचा मेफेड्रोन (एमडी) अंमली पदार्थांचा साठा जप्त