Maratha Reservation | आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजबांधवांचे सोलापूरात रेल रोको आंदोलन
सत्ताकारण न्युज नेटवर्क
Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी अंतरावली सराटी येथे Manoj Jarange-Patil यांनी उपोषणास सुरवात केली आहे. त्यांनी पूर्णपणे अन्नत्याग केल्याने त्यांची तब्येत खालावत चालली आहे. परिणामी त्यांच्या समर्थनार्थ राज्यभरातील मराठा समाजबांधव रस्त्यावर उतरला आहे. कित्येक जिल्ह्यात रेल्वे रोको, रास्ता रोको, बाजारपेठा बंद, एसटी सेवा बंद, वाहनांची जाळपोळ, मराठा समाजाच्या आमदारांच्या घरावर-गाड्यांवर दगडफेक अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आज आरक्षणासाठी राज्यभरातील मराठा समाज आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.
हे ही वाचा Maratha Reservation GR | मोदींचा एक फोन येऊ द्या; हे तिघे लगेच जीआर घेऊन येतील
Maratha Reservation च्या मागणीवरून मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूरसह बहुतेक जिल्ह्यांमध्ये जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. काही एसटी गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज दिवसभर एसटी गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. पोलिसांशी चर्चा करूनच त्यांच्या सूचनांनुसार वेगवेगळ्या मार्गांवरून एसटी गाड्या सोडण्याच्या सूचना सर्व विभाग नियंत्रकांना दिल्या आहेत.
सोलापूर शहरात मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा सोलापुरच्या वतीने नूतन जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या प्रवेशव्दाराला टाळे ठोकण्यात आले आहेत.
हे ही वाचा Maratha Reservation Movement | अजित पवार, विखे-पाटील, राणे मराठा समाजातील गद्दार
भाजपचे आमदार सुभाष देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी
सकल मराठा समाज जुळे सोलापूरच्या वतीने सोलापूर दक्षिण मतदार संघाचे भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांच्या राजीनामाची मागणी केली आहे. यावेळी आंदोलकांनी आमदार सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानसमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी दिल्या. गेली 6 दिवसापासून मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांची तब्येत खालावली असतानाही सरकारला जाग येत नाही. सत्तेतील लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प आहेत. परिणामी यावेळी मराठा समाजातील तरुणांनी भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी त्यांचा निषेध करून त्यांच्या विरोधात घोषणा देत निघून गेले. तसेच राजीनाम्याची मागणी यावेळी करण्यात आली.
Maratha Reservation ला वकीलांचाही पाठींबा
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सोलापूर बार असोसिएशन सोलापूर मधील सर्व वकील बांधवांच्यावतीने एक दिवसीय काम बंद आंदोलन करण्यात आले.
हे ही वाचा Maratha Reservation News | मनोज जरांगे-पाटील आरक्षणासाठी पुन्हा मैदानात
Maratha Reservation Protest | मराठा आरक्षणाबाबत आक्रमक मनोज जरांगे-पाटील कोण आहेत?
Devendra Fadnavis On Maratha Reservation | आणि लाठीचार्जवर देवेंद्र फडणवीसांनी मागितली माफी