जालना : प्रतिनिधी
Maratha Reservation GR : सरकारला दिलेली मुदत संपली आहे, तरी अजूनही कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषण करणार आहेत. यावेळी ते म्हणाले, पंतप्रधान मोदींचा एक फोन येऊ द्या, , हे तिघे जीआर घेऊन अंतरवाली सराटीमध्ये येतील, असा टोलाही जरांगे-पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना लगावला आहे.
मनोज जरांगे-पाटील यांनी आरक्षण मिळेपर्यंत ना अन्न, ना पाणी, ना वैद्यकीय उपचार घेणार, अशी भूमिका घेतली आहे. तसेच आता पंतप्रधान मोदी यांनी मराठा आरक्षण प्रश्नात लक्ष द्यावे, अशी विनंती केली. मराठा आरक्षणासाठी जरांगे-पाटील यांनी राज्य सरकारला 40 दिवसांची मुदत दिली होती. ही मुदत काल (24 ऑक्टोबर 2023) संपली आहे. त्यानंतर आज जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषद घेत त्यांनी याबाबतची घोषणा केली. यापूर्वी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी थेट पंतप्रधान मोदी यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याची पुन्हा एकदा मागणी केली आहे.
हे ही वाचा अजित पवार, विखे-पाटील, राणे मराठा समाजातील गद्दार
जरांगे-पाटील म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आणि मराठ्यांना आरक्षण देणार (Maratha Reservation GR) असल्याचे सांगितले आहे. परंतु सरकारने गेल्या 40 दिवसांत काहीच केले नसल्याचे दिसत आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांचा सन्मान करतो. ते दिलेला शब्द पाळतात असे म्हणतात. परंतु त्यांना कोणीतरी आरक्षण देण्यापासून थांबवत आहे, ते लोक कोण आहेत ? हे शोधावे लागेल. आता आमच्या लेकरा-बाळांचा प्रश्न आहे. त्यामुळे मी उपोषणावर ठाम आहे. इतरांना जसे दिले तसेच आरक्षण (Maratha Reservation GR) आम्हाला द्यायला हवे. मराठा समाज आरक्षणाच्या सर्व निकषांमध्ये बसत आहे. त्यामुळे सतत कोणीही कायद्याचा उल्लेख करून आरक्षण देण्यास टाळाटाळ करू नये.
हे ही वाचा मराठा आरक्षणाबाबत आक्रमक मनोज जरांगे-पाटील कोण आहेत?
आम्ही मागच्यावेळी पंतप्रधान मोदी यांना आरक्षणाच्या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती. हा विषय गंभीर आहे. मराठा समाजाची संख्या मोठी आहे. त्यामुळे याची दखल घ्यावी, असे आम्ही म्हणत होतो. पूर्वी वाटायचे मोदींना गोरगरिबांच्या प्रश्नांची जाण आहे. परंतु ते खरोखरच गरिबांची दखल घेतात का ? याची आता शंका येत आहे. परंतु मी सांगतो, आरक्षणाच्या मुद्द्यावर मोदींना बैठक घ्यावयची गरज नाही. त्यांचा एक फोन या तिघांना येऊ द्या, आरक्षण जाहीर झाल्याचा कागद (Maratha Reservation GR) चार वाजेपर्यंत नाही आला, तर बघा. आरक्षण दिल्याची ब्रेकिंग बातमी होईल, असा दावा त्यांनी यावेळी केला.
हे ही वाचा Eknath Shinde यांचा व्हिडीओ व्हायरल होताचं दौरा रद्द