– सोलापुर शहर महिला काँग्रेसकडून जिल्हाधिकाऱ्यांनाकडे मागणी
सोलापूर : प्रतिनिधी
Manipur Violence News : मणिपूरमध्ये महिलांवर झालेल्या (Manipur Violence) अमानवीय अत्याचारी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्या (Give death sentence to the accused). तेथील हिंसाचार थांबविण्यासाठी दंगेखोरांवर कड़क कायदेशीर कारवाई करा आणि राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी सोलापुर शहर महिला काँग्रेसच्यावतीने (Congress) अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे आणि पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कुमार आर्शिवाद यांच्याकडे निवेदनाव्दारे केली.
हे ही वाचा Alphabet Layoffs | ‘गुगल’कडून पुन्हा कर्मचारी कपात
निवेदनादनात म्हटले आहे की, मणिपूरमध्ये (Manipur Violence News) गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील भाजप सरकारचा नाकर्तेपणा आहे. यामुळे शेकडो लोकांचा बळी गेला आहे. हजारो लोकांचा संसार उध्वस्त झाला आहे. लाखो रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. या दंगलीत कारगिल युद्धात लढलेल्या सैनिकांची पत्नी आणि इतर महिलांना नग्न करून धिंड काढून त्यांच्यावर अत्याचार करण्याचा अमानवी प्रकार समोर आला आहे. मानवतेला काळीमा फ़ासणारी ही घटना आहे. याबाबत पंतप्रधान मोदी तोंड उघडायला तयार नाहीत. मणिपूरमधील हिंसाचार व महिला अत्याचार प्रकरण हाताळण्यास केंद्रातील मोदी आणि मणिपुरातील भाजप (BJP) सरकार हे सपशेल अपयशी ठरले आहे. म्हणून आम्ही या निवेदनाद्वारे मागणी करत आहोत की, मणिपूर राज्यात महिलांवर झालेल्या अमानवीय अत्याचारी घटनेतील आरोपीना अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावे, तेथील हिंसाचार थांबविण्यासाठी सरकारने दंगेखोरांवर कड़क कायदेशीर कारवाई करावी. तसेच मणिपूरमधील भाजपाचे सरकार कायदा आणि सुव्यवस्था राखण्यामध्ये अपयशी ठरल्याबाबत ते सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी. अन्यथा महिला काँग्रेस आणखी तीव्र आंदोलन करेल, असा ईशारा देण्यात आला आहे.
हे ही वाचा Shopsy | Flipkart आणि Amazon पेक्षा स्वस्त:त प्रोडक्ट्स विकत आहे ‘ही’ वेबसाइट
यावेळी महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे, माजी महिला अध्यक्षा हेमा चिंचोळकर, सुमन जाधव, करीमुन्नीस बागवान, शोभा बोबे, संध्या काळे, मुमताज तांबोळी, अंजली मनगुळीकर, चंदा काळे, शुभांगी लिंगराज, मुमताज मदर शेख, सुनीता बेरा, नीता बनसोडे, रेखा बिनेकर, रुकीयाबानु बिराजदार, लता सोनकांबळे, संतोषी गुंडे, सलीमा शेख, मुमताज शेख, मनीषा भोसले, भाग्यश्री कदम, विजयलक्ष्मी झाकणे, द्रोपदी शिवशरण, वसंती भस्मे, अनिता भालेराव आदी उपस्थित होत्या. Manipur Violence News