सत्ताकारण न्युज नेटवर्क : पुणे
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लवकरात लवकर टीबी मुक्त भारत करण्याचे स्वप्न आहे. त्यासाठी सध्या केंद्र आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने सदरचे अभियान राबविले जात आहे. तरी टीबी मुक्त भारत अभियान यशस्वी करा, अशी सुचना उपसंचालक (कुष्ठरोग व क्षयरोग) डॉ. राधाकिशन पवार यांनी पुणे विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या.
हे ही वाचा डॉ. राधाकिशन पवारांकडून स्त्रियांचे शोषण, 500 कोटीहून अधिकच्या भ्रष्टाचारासह विविध गंभीर आरोप
राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत सध्या टीबी मुक्त भारत अभियान 2.0 अंतर्गत शंभर दिवसीय विशेष कार्यक्रमाचे नियोजन केंद्र व राज्य सरकार यांनी मिळून केलेले आहे. यासंदर्भात उपसंचालक (कुष्ठरोग व क्षयरोग) डॉ. राधाकिशन पवार यांनी विश्रांतवाडी येथील कार्यालयातून पुणे परिमंडळातील सोलापूर, पुणे व सातारा जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना देण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्स घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी सुचना दिल्या. यावेळी उपसंचालक डॉ. भगवान पवार उपस्थित होते. यावेळी डॉ. राधाकिशन पवार म्हणाले, शासनामार्फत वेळोवेळी सुचना निर्गमित केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हायरिस्क गावामध्ये आयुष्यमान आरोग्य शिबिर राबवून 14 वर्षे वयावरील सर्व लोकसंख्येचे क्षयरोगासाठी तपासणी करा. सर्व लाभार्थींचे क्ष किरण तपासणी व त्या दिवशी दूषित आढळल्यास त्यांची थुंकी तपासणी करा. परंतु पुणे विभागातील तिन्ही जिल्ह्यातील कामकाज फारसे समाधानकारक नाही. त्यामुळे सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक तसेच वैद्यकीय अधीक्षक व तालुका आरोग्य अधिकारी यांनी टीबी मुक्त भारत अभियानामध्ये जाणीवपूर्वक लक्ष देऊन हे अभियान यशस्वी करावे. या अभियान काळात हलगर्जीपणा केल्यास सक्त कारवाई करण्याच्या सुचनाही यावेळी डॉ. राधाकिशन पवार यांनी दिल्या.
हे ही वाचा “स्वप्ना”तल्या नटीला “माने”नं मारली मिठी…
आरोग्य मंत्र्यांच्या नावे 25 लाखांची मागणी; आरोग्य विभागातील “राखी सावंत”चा अजब कारभार
क्षेत्र कर्मचाऱ्यांच्या प्रमोशनसाठी “भगवान”च्या दानपेटीत प्रत्येकी अडीच लाखांचा दक्षिणा




