- आरोग्य यंत्रणेचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी व्हिजन २०३५
- आरोग्यावरील खर्च दुप्पट करणार,गुंतवणूक वाढविणार
- दोन आठवड्यात आराखडा तयार करणार
- औषधखरेदी, रिक्त पद भरती तातडीने पूर्ण करणार
मुंबई : प्रतिनिधी
Maharashtra Health Department Vision 2035 : नांदेड हॉस्पिटलमधील दुर्घटनेच्या पार्श्वभुमीवर राज्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम बनवणे गरजेचे आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी राज्यातील 34 जिल्ह्यांत सुसज्ज, सुपर स्पेशालिटी रुग्णालये उभारा. राज्यातील आरोग्य यंत्रणेचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी व्हिजन 2035 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी जाहिर केले आहे. तसेच यासाठीचा आराखडा दोन आठवड्यात तयार करा, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या-त्या जिल्ह्यातील जिल्हा प्रशासनाला आज, सोमवारी (9 ऑक्टोबर 2023) रोजी झालेल्या बैठकीत दिल्या आहेत.
हे ही वाचा Pharmaceutical Corporation | औषध महामंडळात मंत्र्यांचा “गरजे” महाराष्ट्र माझा
राज्यातील आरोग्य यंत्रणेचा संपूर्ण कायापालट करण्याच्या दिशेने (Maharashtra Health Department Vision 2035) आज राज्य शासनाने मोठे पाउल टाकले आहे. ज्यामध्ये सार्वजनिक आरोग्यावरील खर्च दुप्पट करणे, सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व सुविधांयुक्त स्पेशालिटी रुग्णालये उभारणे, ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी युद्धपातळीवर पाऊले टाकण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले आहेत. येत्या 15 दिवसांत सचिवांच्या समितीने नवीन वैदयकीय महाविद्यालयांच्या जोडीने राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये सर्व सुविधांयुक्त जिल्हा रुग्णालये उभारण्याबाबत आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या. तसेच 2035 पर्यंत आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणाचा विचार करून राज्यासाठी एक आरोग्याचे सर्वंकष व्हिजन तयार करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमा, अशा सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत.
हे ही वाचा Health Minister Tanaji Sawant | आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या फोटोला काँग्रेसकडून गाजराचा हार
राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेबाबत आज मंत्रालयात आढावा बैठक बोलावण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आरोग्यावरील गुंतवणूक, पदभरतीबाबत सुचना दिल्या. बैठकीस कृती दलाचे अध्यक्ष डॉ. दीपक सावंत, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, मुख्य सचिव मनोज सौनिक, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिव दिनेश वाघमारे, संचालक वैद्यकीय शिक्षण डॉ. दिलीप म्हैसेकर, वैद्यकीय आयुक्त राजीव निवतकर, आयुक्त आरोग्य सेवा धीरजकुमार आणि इतर सचिवांची उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला पुढील प्रमाणे निर्देश दिले.
जिल्हाधिकाऱ्यांनी औषध खरेदी, उपकरणे तत्काळ खरेदी करावीत
जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा नियोजन समितीमधून औषध खरेदीचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी वेळ न गमावता आपापल्या जिल्ह्यांतील औषध खरेदी, वैद्यकीय उपकरणे खरेदी दरपत्रकानुसार तत्काळ करावी. जीवरक्षक, अत्यावश्यक औषधांची खरेदी वेगळी दरपत्रक मागवून तत्काळ करावी. कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही जिल्ह्यातील रुग्णालयांमधून औषधे नाहीत, अशी तक्रार येणार नाही, याची काळजी घ्यावी.
जिल्हा रुग्णालये अद्ययावत करण्यावर भर
वैद्यकीय महाविद्यालयांना संलग्न झाल्यामुळे 13 जिल्हा रुग्णालये बंद झाली आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागाकडे 12 जिल्हा रुग्णालये हस्तांतरित करण्यात येणार आहेत, हे लक्षात घेऊन 25 जिल्ह्यांमध्ये नवीन अद्ययावत, सर्व सुविधा असलेली जिल्हा रुग्णालये उभारण्याचे तसेच सध्या वैद्यकीय महाविद्यालयांशी जोडलेल्या जिल्हा रुग्णालयांचे श्रेणीवर्धन करण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव, वैद्यकीय शिक्षण सचिव यांच्या समितीने येत्या 15 दिवसांत हा आराखडा तयार करण्याच्या सूचना यावेळी दिल्या. १४ जिल्ह्यातील स्त्री रुग्णालयांना देखील पुरेसे बळकट करा, असे त्यांनी यावेळी निर्देश दिले. मोठ्या शस्त्रक्रियांसाठी राज्यातील जिल्हा रुग्णालयांत अद्यावत सुविधा असल्या पाहिजेत. प्राथमिक उपकेंद्रे, उप जिल्हा रुग्णालये सक्षम झाल्यास शहरातील शासकीय आरोग्य यंत्रणांवर ताण पडणार नाही. त्यामुळे यांचे देखील अद्ययावतीकरण करण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
हे ही वाचा Ganapath Movie Teaser | टायगर श्रॉफ-क्रिती सेनॉन च्या ‘गणपत’ चित्रपटाचा टीझर रिलीज
आरोग्यावरील खर्च वाढवा
राज्यात सार्वजनिक आरोग्यावरील खर्च वाढविणे गरजेचे आहे. आरोग्य क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक देखील केली पाहिजे. पंधराव्या वित्त आयोगाने दिलेला निधी येत्या मार्चपर्यंत खर्च झालाच पाहिजे. रुग्णवाहिका, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य संस्थांचे बांधकाम, वैद्यकीय उपकरणे आदींसाठी 8 हजार 331 कोटी रूपयांचा निधी पुरवणी मागणीसह मंजूर करण्यात येत असून 1 हजार 263 कोटी अतिरिक्त निधी लागणार आहे. हुडको कडून 141 आरोग्य संस्थांच्या बांधकामासाठी 3 हजार 948 कोटी रूपये निधी मंजूर झाला आहे, तो देखील निधी वेळेत खर्च झाला पाहिजे. आशियाई विकास बँकेकडून 5 हजार 177 कोटींचे कर्ज नवीन आरोग्य संस्थांसाठी मिळणार आहे. केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात निधी द्यायला तयार आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग यांनी मिळालेला निधी 31 मार्च पर्यंत करावा, असेही निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.
हे ही वाचा अखेर Jio AirFiber लाँच; 599 रुपयांत मिळणार ‘या’ शहरांना हायस्पीड इंटरनेट सेवा
प्राधिकरणावर तातडीने अधिकारी नेमा
महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणावर तातडीने भारतीय प्रशासन सेवेतील मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच इतर 8 पदांवर अधिकारी नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. शिवाय आवश्यक 45 पदांची निर्मिती करण्यासाठी विभागाने वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठवावा, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या.
पद भरतीला गती द्या
सध्या आरोग्य विभागात 19 हजार 695 पदे रिक्त आहेत. ती पदे भरण्याची कार्यवाही टीसीएसमार्फत सुरु आहे. पुढील महिन्यापर्यंत ही पदे भरली जातील, हे पाहावे.38 हजार 151 पदे यापूर्वीच भरण्यात आली आहेत, अशी माहिती यावेळी बैठकीत देण्यात आली.
अनुकंपाची पदे तत्काळ भरा
प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील आरोग्य विभागातील तांत्रिक पदांसाठीची अनुकंपा पदे तत्काळ भरवीत, त्यासाठीची कार्यवाही करावी, असे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.
आणखी नऊ परिमंडळ निर्माण करणार
राज्यात आरोग्य विभागाची 8 सर्कल्स आहेत. वाढती लोकसंख्या आणि रुग्णांचा ताण लक्षात घेऊन आणखी नवी 9 परिमंडळ निर्माण करण्याचा प्रस्ताव तातडीने देण्याचे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले. (Maharashtra Health Department Vision 2035)
ग्रामीण भागात टेलिमेडिसिन यंत्रणा
ग्रामीण आणि दुर्गम भागात टेलीमेडीसीनचा उपयोग वाढविल्यास इतर ठिकाणच्या आरोग्य यंत्रणांवर येणारा ताण कमी होण्यास मदत होईल, अशी सुचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्याला अनुसरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशी यंत्रणा जिथे आवश्यक असेल, तिथे तत्काळ कार्यान्वित करण्याचे निर्देश दिले.
स्वच्छतेवर भर द्या
जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: जिल्हा रुग्णालये तपासावीत. आपल्या अधिकाऱ्यांमार्फत ग्रामीण व इतर शासकीय रुग्णालयांना नियमित भेटी देणे सुरु करावे. यामुळे निश्चितच फरक पडणार असून रुग्णालयात उत्तम स्वच्छता राहील. स्वच्छतेवर भर द्या. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आदींची सोय असेल याकडे लक्ष द्यावे. (Maharashtra Health Department Vision 2035)
डासांचा प्रादुर्भाव रोखा
राज्यात डासांमुळे मलेरियाचे प्रमाण वाढले आहे. डेंग्यू बाबतीत देखील प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात. रक्तदान शिबिरे मोठ्या प्रमाणात घ्यावीत. ब्लड बँकांना भेटी द्याव्यात. जनजागृती करावी, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी आज दिले आहेत. (Maharashtra Health Department Vision 2035)