Mahaparinirvana Din : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत, मेणबत्ती प्रज्वलित करून सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन मनोभावेअबालवृद्धांनी अभिवादन केले. यावेळी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, संस्था, समाजबांधव तसेच अधिकाऱ्यांकडून अभिवादन करण्यात आले. समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली.अभिवादनासाठी जनसागर लोटला होता.
सोलापूर महानगरपालिकेच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास व कौन्सिल हॉल येथील आयुक्त यांच्या कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
तसेच बुधवार पेठेतील मिलिंद नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थीविहार प्रेरणाभूमी येथे आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे, नगर अभियंता लक्ष्मण चलवादी, माजी गटनेते आनंद चंदनशिवे, माजी सभागृह नेते श्रीनिवास करली, कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे, माजी नगरसेवक गणेश पुजारी, माजी नगरसेविका संगीता जाधव, सुशील सरवदे, विभागीय अधिकारी नंदकुमार जगधने, विभागीय अधिकारी एम. बी. शेख, बापू सदाफुले, शिवम सोनकांबळे, संजय बाबरे, नितीन गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी जगभरात एकाच दिवशी “’ब्लड फॉर आंबेडकर’’ या घोषवाक्यानुसार सोलापूरात छञपती शिवाजी महाराज रुग्णालय, शासकिय रक्तपेढीमार्फत हुतात्मा स्मृती मंदिर शेजारी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. यावेळी डॉ. औदुंबर मस्के, रक्तपेढीचे प्रमुख डॉ. सुशील सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले. या शिबिरात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवत रक्तदान करून अभिवादन केले. तसेच डॉ. आंबेडकर पुतळा परिसरात सोलापूर शासकीय रुग्णालय रक्तपेढी, बुद्धराष्ट्र प्रतिष्ठान, भीमशक्ती बहुउद्देशीय सामाजिक संस्था व परिवर्तन कला व क्रीडा सामाजिक संस्थांच्यावतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त एक वही एक पेन हा उपक्रम विविध संस्थांच्या वतीने राबविण्यात आला. विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिविहार ट्रस्ट, छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठान, सत्यशोधक परिवार, डॉ. आंबेडकर कलाकार समिती या सर विविध सामाजिक संस्थांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी एक वही एक पेन या संकल्पनेतून छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठानने अभिवादन केले. यंदाच्या वेळी 67 डझन वह्या आणि पेन हे प्रेरणाभूमी ट्रस्ट कडे सुपूर्द करण्यात आल्या. या वह्या आणि पेन प्रेरणाभूमी ट्रस्टचे प्रमुख ज्येष्ठ नेते सुभानजी बनसोडे यांनी रावजी सखाराम हायस्कूल आणि सोलापूर मनपा शाळा क्रमांक 11 येथील शिक्षकांकडे सुपूर्द केल्या. यावेळी शाहूराजे प्रतिष्ठानच्यावतीने देवा उघडे आणि रावजी सखाराम हायस्कूलच्यावतीने शिरसाट यांनी श्रद्धांजली पर मनोगत व्यक्त केले. यावेळी उत्तम आबुटे प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिल भोसले, सचिव कांत उघडे, कार्याध्यक्ष समाधान आबुटे, मनिष केत, माऊली पवार, अहाद शेख, सचिन वाघमारे, शशीकांत तळमोहिते, केवल बाबरे, प्रविण तळभंडारे, कैलास बाबरे, रोहित तळमोहिते, रोहन बनसोडे, उमेश पवार, महादेव वायदंडे, आकाश इंगळे, युवराज बडेकर,अमित कांबळे, प्रविण गायकवाड, वैजू सुरवसे, वीर रणशृगांरे व बहुसंख्येने सभासद उपस्थित होते. सूत्रसंचालन अनुराग सुतकर यांनी केले.
समता सैनिक दल शहर जिल्हा सोलापूर शाक्य संघ, सिध्दनाक ब्रिगेड यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मानवंदना देण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य साहित्यिक व सांस्कृतिक मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ.प्रा.रतनलाल सोनाग्रा, सिद्धनाक ब्रिगेडचे जयानंद कांबळे,समता सैनिक दलाचे ज्येष्ठ सैनिक अंबादास कदम, शाक्य संघाचे अंगद मुके , केरू जाधव, अंगद जेटीथोर, विजय कांबळे,विठ्ठल थोरे,सुमित्रा जाधव,सुचित्रा थोरे,सुधीर चंदनशिवे, चंद्रकांत कोळेकर,प्रेमलता कांबळे,मीना गायकवाड,सुरवसे,अनिल जगजाप,सुनील डांगे, ज्ञानेश्वर प्रक्षाळे, राजेंद्र हजारे, संगीता कांबळे,मोतीराम गडेराव, अनिल गायकवाड,बापूसाहेब गायकवाड,रत्नदीप कांबळे , शाहू दावणे,संभाजी तळभंडारे,शांतीकुमार कांबळे, मुकुंद चंदनशिवे, गौतम चंदनशिवे आणि तिन्ही दलातील सैनिक उपस्थित होते.
भाजपच्या आमदार, माजी खासदारांनी केले अभिवादन !
भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, माजी खासदार अमर साबळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केले. दरम्यान, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पूर्णाकृती पुतळ्यास भाजप आ. सुभाष देशमुख यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली.यावेळी संगीता जाधव, सोमनाथ केंगनाळकर, विशाल गायकवाड, आनंद बिराजदार, अर्जुन जाधव, सत्ता नडगेरी, श्रीनिवास करली, शिवशरण बब्बे, श्रीनिवास पुरुड, दीपक जमादार, शिवराज सरतापे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माकपच्या वतीने डॉ. आंबेडकर यांना अभिवादन!
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दत्त नगर पक्ष कार्यालय येथे रंगप्पा मरेड्डी व कुरमय्या म्हेत्रे व पार्क चौक येथे माजी आमदार नरसय्या आडम यांच्या हस्ते पुष्हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी एम.एच.शेख यांनी संबोधित केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ॲड.अनिल वासम यांनी केले. यावेळी नसीमा शेख, शेवंता देशमुख,सुनंदा बल्ला, लिंगव्वा सोलापूरे, वीरेंद्र पद्मा, बाळकृष्ण मल्याळ,विजय हरसुरे,नागेश म्हेत्रे,नरसिंग म्हेत्रे,दाऊद शेख, जावेद सगरी,अभिजित निकंबे,दत्ता चव्हाण,प्रदीप मरेड्डी,बजरंग गायकवाड,बालराज म्हेत्रे,सिद्राम गडगी,युसुफ शेख संजीव ओंकार,गोपाळ जकलेर, मल्लिकार्जुन बेलीयार, सनी आमाटी, अंबादास बिंगी,नितीन गुंजे,गंगाराम निंबाळकर अंबादास गडगी आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.