प्रतिनिधी : सोलापूर
उजनी कालवा विभाग क्र. 8, सोलापूर येथील कार्यकारी अभियंता डी. जे. कोंडेकर यांच्याकडून मनमानी पध्दतीने मर्जीतील मक्तेदारांना टेंडर वाटप करणे, यावेळी शासन निर्णयातील नियम-अटी डावलून चुकीच्या पध्दतीचा अवलंब करणे, मर्जीतील मक्तेदारांना टेंडर देण्यासाठी इतर पात्र मक्तेदारांना जाणूनबुजून अपात्र करणे, मर्जीतील मक्तेदार अपात्र असतानाही त्यांना पात्र ठरवून टेंडर देणे, मक्तेदाराचा दाखला चुकीचा असल्याचा अभिप्राय विभागीय कार्यालयाने देऊनही संबंधीत मक्तेदारास टेंडर देणे असे गैरप्रकार केले आहेत. याबाबत कोंडेकर यांची तक्रार जलसंपदा विभाग, पुणे मुख्य अभियंता डॉ. ह. तु. धुमाळ यांच्याकडे केली होती. त्यावर मुख्य अभियंता धुमाळ यांनी श्री. लोडावत यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती. अखेर त्या चौकशी समितीने आठ दिवसांपूर्वी अहवाल सादर केला असुन कार्यकारी अभियंता डी. जे. कोंडेकर आणि संबंधीत मक्तेदार यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
हे ही वाचा राज्यात “Women In Leadership Roles”मध्ये…
मुख्य सचिव दिपक कपूर यांच्या अध्यक्षतेखाली व्हावी सर्व कामांची चौकशी
डी. जे. कोंडेकर हे सोलापूर पाठबंधारे विभाग, सोलापूर येथे कार्यकारी अभियंता पदी 13 सप्टेंबर 20219 ते 7 जून 2020 या कालावधीत कार्यरत होते. यावेळी त्यांनी श्रीराम कंस्ट्रक्शन, माढा, मे. गुरूकृपा स्टील इंडस्ट्रिज, लातूर आणि श्री. विशाल वसंत जोग, होटगी रोड, सोलापूर आदींना मनमानी पध्दतीने कामाचे वाटप केले आहे. तसेच उजनी कालवा विभाग क्र. 8 येथे सध्या कार्यरत असतानाही अशाच पध्दतीने कामकाज केले आहे. त्यामुळे सर्व वर्कऑर्डरची चौकशी मुख्य सचिव दिपक कपूर यांच्या अध्यक्षतेखाली व्हावी. जेणेकरून येथील भ्रष्टाचार आणि जनतेच्या पैशांची होणारी लूट उघडकीस येऊ शकेल आणि यापुढे गैरकारभाराला आळा बसून पारदर्शक कारभार होईल.
हे ही वाचा दिनानाथ मंगेशकर रूग्णालय वादग्रस्त प्रकरण; चौकशी समितीचे अध्यक्षच वादाच्या भोवऱ्यात
आरोग्य मंत्री “ॲक्शन मोड”वर; अधिवेशनात तारांकीत प्रश्नांच्या अनुषंगाने कारवाईचे दिले आदेश