
अभिनेत्री Kareena Kapoor ने चित्रपटात काम करणे बंद केले आहे का ? सध्या तिच्या आयुष्यात काय सुरु आहे? याबाबत तिचे चाहते नेमीच सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित करत असल्याचे दिसून येते. परंतु आता खुद्द करिना कपूर ने OTT प्लॅटफॉर्म वर ‘जाने जान…’ घेऊन येत असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे तिच्या चाहत्यामध्ये उत्सुकता आहे.
करिना कपूर ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. जिने अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या चाहत्यांमध्ये ती खूप लोकप्रिय आहे. परंतु तिच्या चाहत्यांना वाटते आहे की, लग्नानंतर तिचे करियर संपले आहे. मात्र Kareena Kapoor ला नवीन चित्रपटांमध्ये पाहण्यासाठी तिचे चाहते अजूनही उत्सुक आहेत. करिनाने १९ वर्षांची असताना अभिनयाला सुरुवात केली होती आणि प्रदीर्घ काळ ती इंडस्ट्रीत आहे. अलीकडेच, तिने एका मुलाखतीत सांगितले की, ती बॉलिवूडमधून निवृत्त होणार आहे. या तिच्या निर्णयामुळे तिचे चाहते उलट सुलट चर्चा करत आहेत.
करिना कपूर म्हणाली की, तिला चित्रपटात काम करायला खूप आवडते. तिला काळजी वाटते की, एके दिवशी तिला यापुढे तितकाच उत्साह किंवा स्वारस्य वाटणार नाही. असे कधी झाले तर ती अजून लहान असली तरी अभिनय करणे थांबवेल. तिचा असा विश्वास आहे की, आपण जे करता त्याबद्दल नेहमीच तीव्र इच्छा आणि उत्सुकता असणे महत्वाचे आहे.




